आश्वी । झुंजार न्यूज  

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त २२ जुलै २०२४ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) विभागातर्फे शिक्षण सप्ताह राहाता तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पाथरे बु येथे साजरा करण्यात आला . 
या सप्ताहा दरम्यान दररोज विविध विषयाचे दिवस घेण्यात आले . विद्यालयामध्ये सप्ताहाला  सोमवार पासून सुरूवात करण्यात येवून त्याची सांगता रविवारी झाली
सप्ताहाच्या पहिल्या दिवशीअध्ययन व अध्यापन साहित्य दिवस ‘ यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा विद्यार्थी व शिक्षकांनी समजावून घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले . या साहित्याच्या माध्यमातून संकल्पना स्पष्ट केल्या. शैक्षणिक साहित्यातून अध्ययन व अध्यापन किती सोपे होते. कठीणकडून सोप्याकडे कसे आणले जाते, आनंददायी शिक्षणाची निर्मिती कशी केली जाते, हे या उपक्रमातून स्पष्ट झाले. rया उपक्रमात शैक्षणिक उपक्रम राबवत असताना विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अत्यंत आनंद, उत्साह चैतन्यपूर्ण वातावरण व साहित्याची योग्य मांडणी करून विद्यार्थ्यांना ते हाताळून, समजून, उमजून घेऊ दिले. यात शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू, पृष्ठापासून तयार केलेले शैक्षणिक साहित्य, विविध खेळ, आव्हानात्मक कार्ड, संख्या ओळख, वजन मापे, मोजपट्टी, वाक्य बनविणे, कोडी इत्यादी विविध विषयांवर आधारित माहितीचे तक्ते बनवून तयार करणे, गणितीय संबोध इत्यादी शैक्षणिक साहित्याची स्वत: मांडणी करून शिक्षण सप्ताहाचा पहिला दिवस शाळेत साजरा करण्यात आला.
सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस ‘  विद्यार्थ्यांना संख्याज्ञानाची कल्पना यातून मिळावी यासाठी वेगवेगळे उपक्रम विद्यालयात घेण्यात आले . सप्ताहाच्या तिसऱ्या ‘ शालेय क्रीडा ‘ या उपक्रमासाठी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसह  उपक्रम यशस्वी प्राचार्य , उपप्राचार्य , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. सप्ताहाच्या चौथ्या दिवशी ‘ सांस्कृतिक दिवस ‘ यात वैयक्तिक गीत गायन स्पर्धा नाटक समूह  नृत्य यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .सप्ताहाच्या पाचव्या दिवशी ‘ कौशल्य व डिजिटल ‘ दिवस यात कागदी पिशव्या तयार करणे कागदी टोप्या तयार करणे आकाश कंदील तयार करणे मातीच्या वस्तू बनवणे इत्यादी उपक्रम घेण्यात आले. सप्ताहाच्या सहाव्या दिवशी ‘ इको क्लब ‘ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीम कचरा व्यवस्थापन जलसंधारण ऊर्जा संवर्धन याविषयी माहिती देऊन समिती निर्माण करण्यात आली होती .सप्ताह सांगता च्या दिवशी ‘ शैक्षणिक उत्कृष्टतेचा ‘ यावेळी गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कुल कमिटी उपाध्यक्ष आबासाहेब पा. घोलप हे होते. तर प्राचार्य बारगुजे , उपप्राचार्य सौ वाणी , पारखे , को-हाळे , संरपच उमेश पाटील घोलप , मार्केट कमिटी उपसभापती अण्णासाहेब भाऊसाहेब पाटील कडू , संजय पा. घोलप , खलीलभाई घोणे, घोलप यांच्यासह शिक्षक- शिक्षिका, विद्यार्थी- विद्यार्थिनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed