आश्वी l झुंजार न्यूज

झाडे लावणारा माणुस या पुस्तकाचे वाचन केल्याने स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांना झाडे लावण्याची प्रेरणा मिळाली त्यातून तालुक्यात १९ वर्षापुर्वी दंडकारण्य अभियान सुरु करुन त्यातून करोडो झाडी लावली गेल्याने आज या तालुक्यात एक परिवर्तनाची नांदी दिसत असल्याने यांची नोंद ‘ युनोस्को ‘ या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतल्यानेचं भविष्यात निसर्ग फुलविण्याकरिता प्रत्येक व्यक्तीने दर वर्षीय एक झाड लावून त्यांचे संगोपन करावे असे आवाहन राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख  यांनी केले . 
संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व संगमनेर तालूका सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या शुभहस्ते दंडकारण्य अभियानातंर्गत वृक्षारोपण श्री.क्षेत्र हनुमान मंदिर , श्री.क्षेत्र काळूआई मंदिर , मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्छ माध्यमिक विद्यालय , दशक्रिया विधी घाट आदी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी रणजितसिंह देशमुख पुढे म्हणाले की , दादांनी सुरु केलेल्या दंडकारण्य अभियान गेल्या १९ वर्ष सुरु असून राज्याचे नेते आ बाळासाहेब थोरात , डॉ सुधीर तांबे , सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी लाखोंने झाडे लावली जात आहे . आज झाडांच्या माध्यमातून तालुक्यात मोठे निसर्गरम्य निर्माण झाले असून हीचं वृक्षवेलीची क्रांती आहे . प्रत्येकाला आज झाडाचे महत्त्व समजले आहे . झाडे लावली तरचं निसर्ग फुलेल . आज तालुक्यात विविध संस्थेच्या माध्यमातून , शाळकरी विदयार्थी झाडे लावत आहे . फक्त झाडे लावून उपयोग नाही तर त्यांचे संगोपन होणे सुध्दा तेवढेचं महत्वाचे आहे .
यावेळी सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , अंभोरे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन , व्हा चेअरमन , सचांलक , ह.भ.प नारायणगिरी महाराज सहकारी दूध संस्थेचे चेअरमन , व्हा चेअरमन , सचांलक , मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य , शिक्षक , कर्मचारी , विद्यार्थी , विद्यार्थीनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed