दंडकारण्य अभियानासह अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

संगमनेर l झुंजार न्यूज

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मध्ये सुरू असलेले  अभियान ही पर्यावरणाची मोठी लोक चळवळ झाली असून यामध्ये राज्यातील सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करताना प्रा. बाबा खरात यांनी केले असून त्यांनी या अभियान सह अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांचा जागर केला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील पर्यावरण शास्त्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील पर्यावरण विभागात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. हरिश्चंद्र नवले, साहित्यिक व व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर ,नामदेव कहांडळ, तुषार दिवे आदींसह पुणे विद्यापीठातील विविध अधिकारी उपस्थित होते.

ज्यावेळी बोलताना प्रा. बाबा खरात म्हणाले की, लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्याच्या क्रांतीची ज्योत पेटवली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळाले ते स्वातंत्र्य अभाधित ठेवण्यासाठी अनेक क्रांतिकारक व राष्ट्रपुरुषांनी योगदान दिले यामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचेही मोलाचे योगदान आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक योद्धा म्हणून आपण त्यांना गौरवतो आहे अण्णाभाऊंचे साहित्य मराठी हिंदी स रशियन भाषेत सुद्धा प्रसिद्ध झाले आहे त्यांच्या फकीरा कादंबरीला सर्वोच्च सन्मान मिळाला त्यांच्या विचारांचे आचरण युवा पिढीने केले पाहिजे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी पर्यावरण संवर्धनासाठी संगमनेर मध्ये दंडकारण्य अभियानाची लोक चळवळ उभी केली. आता तिला राज्यपापी स्वरूप झाली असून यामध्ये सर्वांनी मूलभूत कर्तव्य म्हणून सहभाग घ्यावा असे आवाहन केले

तर व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर म्हणाले की पर्यावरण ही मोठी समस्या झाली असून यामध्ये प्रत्येक नागरिक आता संगमनेर तालुक्यात पर्यावरण सैनिक म्हणून काम करत आहेत हेच काम राज्यभर वाढवताना सर्वांनी हरितसृष्टीच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले

याप्रसंगी जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव, टिकाव खोरे घेऊन हाती, जाऊया डोंगराला ,जाऊया डोंगराला झाडी लावूया माथ्याला या गीतांनी परिसर दुमदुमला

यशोधन कार्यालयातही जयंती साजरी

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा झाली यावेळी संगमनेर तालुक्यातील विविध संस्था, व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed