डॉ.जयश्री थोरात यांची संकल्पना : राज्यातील प्रथम आदर्शवत प्रकल्प
संगमनेर । झुंजार न्यूज

याबाबत अधिक माहिती देताना डॉ.थोरात म्हणाल्या की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करताना तालुक्याला विकासातून गौरवशाली बनवले. संगमनेर हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र झाले असून अनेक युवक व युवतींना स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांसाठी अभ्यासाची चांगली सुविधा व्हावी. तसेच तालुक्यातील युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी याकरता युवा संवाद केंद्र अभ्यासिका ग्रंथालय आणि ई लायब्ररी उभारण्यात येणार आहे.

कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी तालुक्यातील युवकांशी साधलेल्या युवा संवाद यातून विविध गावांमध्ये अभ्यासिका व ग्रंथालय करण्याची संकल्पना पुढे आली याकरता डॉ.जयश्रीताई थोरात यांनी पाठपुरावा केला आणि वाचन संस्कृती वाढवण्याकरता राज्यातील आदर्शवत मॉडेल उभारले जाणार आहे. यामध्ये संगमनेर खुर्द , चंदनापुरी धांदरफळ बुद्रुक, समनापुर, कोकणगाव, राजापूर ,डोळासने, तळेगाव दिघे, नान्नज दुमाला, डिग्रस ,निमगाव बुद्रुक व वेल्हाळे येथे हे येथील युवा संवाद केंद्र अभ्यासिका ग्रंथालय आणि ई लायब्ररीच्या विकास कामांसाठी प्रत्येक गावासाठी 30 लाख रुपये असे एकूण नऊ गावातील लायब्ररी साठी 3 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

यातून अद्यावत लायब्ररी अभ्यासिका ई लायब्ररी निर्माण केली जाणार आहे संगमनेर तालुक्यात हे राज्यभरातील पहिलेच मॉडेल ठरणार असून यामुळे तरुण वर्गात वाचन संस्कृती वाढण्यास मोठी मदत होणार असल्याने या अभिनव उपक्रमाचे संगमनेर तालुक्यातील सर्व युवक युवती महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांनी अभिनंदन केले आहे.

मा.शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील युवकांना युवा संवाद केंद्र, अभ्यासिका, ग्रंथालय व ई- लायब्ररी हा राज्यभरात पहिल्याच आदर्शवत उपक्रम होत असून संगमनेर खुर्द ,चंदनापुरी, धांदरफळ बुद्रुक, समनापूर, कोकणगाव, राजापूर, डोळसने, तळेगाव दिघे, नान्नज दुमाला, डीग्रस, निमगाव बुद्रुक व वेल्हाळे येथे या अद्यावत लायब्ररी सह अभ्यासिका होणार आहेत.

