आश्वी l झुंजार न्यूज
राहाता तालुक्यातील पाथरे बु ॥ येथील लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते भास्करराव पाटील घोलप होते. प्रमुख पाहुणे म्हणून संरपच उमेश पाटील घोलप उपस्थित होते .

यावेळी प्राचार्य बालगुजे म्हणाले की , विद्यार्थ्यांमध्ये घडणारे शारीरिक , मानसिक, भावनिक , निरोगी बदलातून आरोग्याची काळजी घ्यावी तर सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांवर मोठया प्रमाणात दुष्परिणाम होत आहे.याकडे पालकांनी लक्ष्य द्यावे वेळीचं चर्चा करून आपण समाजाचा एक भाग आहोत ही जाणीव करून देणे गरजेचे असून सुसंस्कारी जीवन जगण्यावर भर देण्याचे शिकवावे , शिक्षणाने मुलांचा बौद्धिक व शारिरीक विकास तर होतोच पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व विद्यार्थी यांच्यात संवाद फार महत्वाचा आहे .

तर प्रा. नूतन जोंधळे यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थी चारित्र्यसंपन्न बनले पाहिजे संस्कार अंगी बाळगून समाजात प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे पाचात्य संस्कृतीला झिडकारून भारतीय संस्कृतीतील चांगल्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजे असे सांगितले.

यावेळी पालक प्रतिनिधी सौ आशाताई ब्राह्मणे , विद्यार्थी प्रतिनिधी सृष्टी मांढरे, कल्याणी डोखे, लावण्या बनसोडे, विवेक घोडके यांनी आपली मनोगत व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी धोंडीराम पा कडू , किरण पा कडू मोहम्मदभाई शेख , खलीलभाई घोणे आदींसह मोठ्या संख्येने माता पालक उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य बारगुजे , उपप्राचार्य वाणी यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पोपट घोलप सूत्रसंचालन प्रा. संतोष गुळवे यांनी केले. तर आभार प्राध्यापक सुभाष तांबे यांनी मानले.
Post Views: 788

