{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांचे ग्रामस्थांकडून आभार

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज 

उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन पिण्यासाठी व जनावरांसाठी तालुक्यातील अंभोरे धरणातून देव नदीवरील बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे या ग्रामस्थांच्या मागणीची तात्काळ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांनी दखल घेतली असून त्यामुळे जलसंपदा विभागाने शुक्रवारी( दि.५) अंभोरे धरणातून देवनदी बंधाऱ्यात पाणी सोडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी मंत्री विखे-पाटील व आमदार खताळ यांचे आभार मानले आहे.

अंभोरे परिसरात उन्हाच्या तीव्रतेमुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर अंभोरे धरणातून देवनदीवरील बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी महायुतीचे संपत खेमनर, कोंडाजी कडनर,.संतोष बलसाने, संदिप जगनर, सुरजित खेमनर, रामा बर्डे, देवराम खेमनर.,मोहन खेमनर, भाऊसाहेब पाटोळे, खंडू नवले, रावसाहेब आभाळे यांच्यासह अंभोरे ग्रामस्थांनी मंत्री विखे पाटील तसेच आमदार खताळ पा यांच्याकडे केली होती.

 

 

त्यानुसार तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अंभोरे धरणातून देवनदी बंधाऱ्यांत पाणी सोडले आहे. परिसरातील नागरिकांची पिण्याची तसेच जनावरांच्या पाण्याचीही गैरसोय दूर झाली आहे. उन्हाळ्याच्या काळामध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या संकटातून अंभोरेकरांना दिलासा मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *