पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण…..

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

वॉर्मिंगच्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान वाढले आहे, वाढलेली उष्णता, कमी झालेला पाऊस, दुष्काळ, पर्यावरणाचा असमतोल हा सजीव सृष्टीसाठी धोकादायक असून हे टाळण्यासाठी पर्यावरण संवर्धन हे अत्यंत गरजेचे आहे. याकरता येणाऱ्या पावसाळ्यात प्रत्येकाने किमान दोन झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे. तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे  काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे आंतरराष्ट्रीय जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दंडकारण्य अभियान आढावा घेण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक मा आ.डॉ सुधीर तांबे, पांडुरंग पाटील घुले, सौ.दुर्गाताई तांबे, संपतराव डोंगरे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, रामहरी कातोरे, सुनील कडलग, रावसाहेब दुबे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, समन्वयक दशरथ वर्पे, डॉ सुजित खिलारी, अनिल थोरात, सेक्रेटरी किरण कानवडे, प्रा व्ही बी.धुमाळ, कृष्णा दिघे, बाळासाहेब फापाळे, वन विभागाच्या अधिकारी श्रीमती हिरे, संतोष पारधी, परते यांच्यासह विविध विभाग प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, जगापुढे ग्लोबल वार्मिंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वाढती उष्णता कमी झालेला पाऊस हे अत्यंत चिंतेचे आहे. यावर्षी देशांमध्ये कमी पाऊस सांगितला आहे. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास यामुळे या समस्या होत असून यापुढील काळात प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन केलेच पाहिजे.

दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण व वृक्ष संवर्धन संस्कृती तालुक्यात वाढली असून सहकारातील विविध संस्थांनी तालुक्यातील डोंगरांवर वृक्षारोपण करून संवर्धन केले आहे. यावर्षीही प्रत्येक नागरिकांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण करून ते जपावे असे आवाहन त्यांनी केले.

तर मा आ डॉ तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सजीव सृष्टीच्या रक्षणाकरता दंडकारण्य अभियान सुरू केले. तालुक्यामध्ये हे व्रत म्हणून काम सुरू आहे. वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. हिरवाई निर्माण होत आहे यापुढील काळातही गावोगावी प्रत्येक व्यक्तीने वृक्ष संवर्धन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की वृक्ष संवर्धनामध्ये महिलांचाही मोठा वाटा असून महिलांनी आपल्या घराच्या आसपास असलेल्या परसबागांमध्ये वृक्षरोपण करा. आवळा लिंब कडीपत्ता ही वृक्ष ही महिलांनी जोपासले पाहिजे याचबरोबर डोंगरांना लागणाऱ्या आधी ह्या अत्यंत चिंताजनक असल्याचे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग पाटील घुले यांनी केले, तर दशरथ वरपे यांनी आभार मानले. कारखाना कार्यक्षेत्रात 101 अंबा वृक्षांची रोपण यावेळी करण्यात आले.


दंडकारण्य अभियानाचा आढावा

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सहकारी संस्थांच्या वतीने दंडकारण्य अभियान राबवले जात आहे. वृक्षारोपण संवर्धन उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई, येणाऱ्या अडचणींमधून ही अनेक वृक्ष जगली असून या पुढील काळातही अधिक सातत्याने व सतर्कतेने सर्वांनी काम करावे अशा सूचना देत मागील वर्षीच्या कामाचा आढावा डॉ.सुधीर तांबे यांनी घेतला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *