{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात व मा. आ.डॉ सुधीर तांबे यांची उपस्थिती

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात व मा. आ.डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी व गोरगरीब मुलांना गुणवत्तेचे शिक्षण देणाऱ्या जयहिंद आदिवासी आश्रम शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक दशरथ विठोबा वरपे यांचा सेवापुर्ती सोहळा रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 10 वा. येथे आयोजित करण्यात आला आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर व अकोले तालुक्यातील आदिवासी व गोरगरीब बांधवांच्या मुलांना गुणवत्तेचे शिक्षण मिळावे याकरता 2 ऑक्टोबर 1994 रोजी जयहिंद आदिवासी आश्रम शाळा सुरू केली.  पहिल्या दिवसापासूनच शिक्षक आणि मुख्याध्यापकाची जबाबदारी पार पाडणाऱ्या दशरथ वर्पे यांनी अत्यंत शिस्तबद्ध, नियोजन, दूरदृष्टी यावरून या शाळेला लौकिक प्राप्त करून दिला. राज्यस्तरावर या शाळेला उत्कृष्ट आदिवासी आश्रम शाळेचा पुरस्कार मिळाला आहे तर अनेक गोरगरीब मुलांचे विद्यार्थी हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगल्या पदांवर काम करत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची काळजी घेणे त्याच्या नोकरी व करिअरसाठी पाठपुराव्या करण्याबरोबर दशरथ वर्पे यांनी कोळवाडे परिसरात पर्यावरण संवर्धनाचे मोठे काम केले आहे. प्रत्येक कामात कायम सकारात्मक असलेले मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांच्या जीवनामध्ये नाही हा शब्द कधीच आला नाही. दंडकारण्य अभियानाचे समन्वय म्हणून ते सध्या जबाबदारी सांभाळत असून हरमन हिल वर त्यांनी सुमारे 65 हजार विविध झाडे संवर्धन केली आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेत कोळवाडे ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांनी त्यांचा सेवापुर्ती सोहळा घडविण्याचे नियोजित केले आहे. रविवारी महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे ,सौ दुर्गाताई तांबे , रणजीतसिंह देशमुख डॉ.जयश्रीताई थोरात , सुधाकर जोशी, विष्णुपंत रहाटळ ,प्रा. बाबा खरात, काशिनाथ गोंदे, यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 10 वाजता त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

तरी या सेवापूर्ती सोहळ्यासाठी परिसरातील सर्व नागरिक महिला युवक व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सर्व माजी विद्यार्थी संघटना जय हिंद आदिवासी आश्रम शाळा व कोळवाडे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *