कोपरगांव l झुंजार न्यूज

कोपरगांव येथील ज्ञानेश्वरी मुकुंद को-हाळकर हिने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातुन मॅथेमॅटीकल सायन्स या विषयात सेट परिक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.
           
कुमारी ज्ञानेश्वरी को-हाळकर हिचे प्राथमिक शिक्षण सेवानिकेतन कोपरगांव दहावी (८९ टक्के), के जे सोमैया महाविद्यालय बारावी (८८ टक्के) व बी.एस्सी (विशेष प्राविण्य) करत पुणे येथील एस पी कॉलेज येथुन एम. एस्सी मॅथेमॅटीकल सायन्सचे शिक्षण विशेष प्रविण्य मिळवत पुर्ण केले, त्यानंतर तिने स्वतःच सेट परिक्षेची तयारी केली त्यात त्या उत्तीर्ण झाल्या असुन सध्या डी वाय पाटील पुणे या शैक्षणिक संस्थेत असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहेत.
अत्यंत जिदद, चिकाटी मेहनत घेवुन ज्ञानेश्वरी को-हाळकर हिने मिळविलेल्या यशाबददल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या आई सौ. सई मुकुंद को-हाळकर या कोपरगांव न्यायालयात सुप्रिटेडंट म्हणून कार्यरत आहेत
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *