आश्वी महाविद्यालयात सेतू केंद्राची सुरूवात !
आश्वी l झुंजार न्यूज
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमते नुसार परिसरातच कौशल्यांवर आधारित वेगवेगळे कोर्स उपलब्ध करून दिल्यास त्याचा निश्चितच विकास होईल, विनामोबदला कौशल्य प्रशिक्षण आत्मसात करण्याची संधी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होईल असा विश्वास महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला..

मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महसूल पंधरवड्याचे औचित्य साधून आश्वी येथील वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयात आपले सेवा केंद्राचे उद्घाटन आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, प्रवरा अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी प्रांतधिकारी श्री. शैलेंद्र हिंगे, तहसीलदार श्री. धीरज मांढरे, आण्णासाहेब भोसले पाटील, श्री. रामभाऊ भुसाळ पाटील, श्री. कैलास नाना तांबे, श्री, मच्छिंद्र थेटे, डॉ. दिनकर गायकवाड, श्री. बापूसाहेब गायकवाड, श्री. विठ्ठलराव मांढरे, श्री. माधवराव गायकवाड, श्री. भाऊसाहेब जऱ्हाड, अॅड. पोपटराव वाणी, श्री. अजय ब्राम्हणे, श्री. भगवानराव इलग, श्री. अशोकराव म्हसे, सौ. कांचनताई मांढरे, अॅड.रोहिणीताई निघुते, श्री. विजयराव बालोटे, श्री. मकरंद गुणे, श्री. सरुनाथ उंबरकर यांच्यासह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत असताना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवरा अभ्यासिका खूपच उपयुक्त ठरेल. महसूल विभागाच्या माध्यमातून शासकीय दाखल्या करिता महासेतू केंद्राची सुरुवात ही पालक व विद्यार्थ्यासाठी फायदेशीर व सुलभ ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेगवेगळे शासकीय दाखले त्यांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. महेश खर्डे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे, क्रीडा संचालक डॉ. प्रमोद विखे, सेतू कार्यालय समन्वयक प्रा. गणेश शेळके, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र समन्वयक प्रा. संतोष वर्पे, प्रवरा अभ्यासिका चे समन्वयक प्रा. मिनिनाथ औताडे यांचेसह सर्व प्राध्यापकानी विशेष परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता खळदकर यांनी केले

