आश्वी | झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज आयोजित सिने अभिनेते तथा देवराईचे प्रवर्तक सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ” चला सावली पेरुया ” बुधवार दि १४ ऑगस्ट २०२४ सकाळी १०.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संचालक शिवाजी मुंढे यांनी दिली .
शिवाजी मुंढे यांनी पुढे सांगितले की , गेल्या अनेक वर्षांपासून सिने अभिनेते सयाजी शिंदे प्रेरित देवराईशी आम्ही जोडलो गेलो असून संध्याच्या नैसर्गिक परिस्थितीत पर्यावरणाला महत्व देत बालपन स्कूलच्या विदयार्थ्यांना शिक्षणाबरोबर पर्यावरणाची शिकवण दिले जात असल्याने आता विदयार्थ्यांनी हजारो झाडी लावून त्यांचे संगोपन केले व करत आहे त्याचं पार्श्वभूमीवर पानोडी येथील बालपन स्कूल च्या प्रांगणात सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ” चला सावली पेरूया ” हा कार्यक्रम होत आहे .
सकाळी १०.३० वा. वृक्षदिंडी “चला सावली पेरूया…” विद्यार्थ्यांसोबत नाविन्यपूर्ण उपक्रम , सकाळी ११. ०० वा. विद्यार्थ्यांचे पर्यावरण प्रबोधन सांस्कृतिक कार्यक्रम , सकाळी ११.३० वा. बियांचे प्रदर्शन , दुपारी १२.०० वा. वृक्षारोपण तर सचिन चंदने यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे . तरी होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष , सचिव , प्राचार्य, सर्व शिक्षक वृंद बालपण इंग्लिश मिडियम स्कुल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *