{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

आश्‍वी l झुंजार न्यूज

गोरगरीब जनतेची कामे करताना जात आणि धर्म विरहित काम करण्याची शिकवण लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी दिली. त्यांचेच विचार महायुती सरकार कृतीच्या माध्यमातून पुढे घेऊन जाताना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ प्रत्येक जाती धर्माच्या महिलेला देत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी महिलांना ताकात देण्यासाठी ही योजना सुरू केली असून पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर पंधराशेचे वाढवून तीन हजार रुपये करणार असल्याची ग्वाही डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील आश्‍वी खुर्द येथे लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रवरा बँकचे जेष्ठ संचालक बापुसाहेब गायकवाड, कारखाण्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, अ‍ॅड. अनिल भोसले, लोकनियुक्त सरपंच अलका गायकवाड, माजी उप सरपंच संजय गायकवाड, ग्रा प सागर भडकवाड , गणेश भडकवाड , संतोष भडकवाड, शरद भडकवाड , मकरंद गुणे, अविनाश सोनवणे, सुनील उमाप, सौ. हिनाताई उबाळे, काळुराम बोरुडे, दगडू बोरुडे, अरुण बोरुडे, निलेश सरोदे, विलास कदम, दिनकर भडकवाड, डॉ. सचिन क्षीरसागर, प्रा. संजय देशमुख आदि उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की, दिशाभूल आणि आरोप करणाऱ्याकडे लक्ष देऊ नका. सध्या जातीधर्माच्या नावावर मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हे तेढ जोपर्यत बंद होत नाही तोपर्यत समाज प्रगती करु शकणार नाही. युवकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आत्मसात करताना गावातील गरीब कुटुंबाना धान्य तर विधवा व जेष्ठ महिलांना डोल चालू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी रोहित भडकवाड, डॉ. पद्मेश्वरी भडकवाड, डॉ. अविनाश भडकवाड यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत कॉग्रेसचे कैलास भडकवाड, भारत भडकवाड आणि सतिष भडकवाड यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. तसेच उपस्थित महिलांनी डॉ. विखे पाटील यांचे औक्षण करत राख्या बांधल्या. 
दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य सागर भडकवाड, गणेश भडकवाड, शरद भडकवाड , अशोक साळवे, राजेश भडकवाड, रोहित भडकवाड यांच्यासह लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव एकता समिती व वस्ताद प्रतिष्ठाणच्या सर्व कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार गणेश भडकवाड यांनी मानले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *