संगमनेर तालुक्यातील मांची हिल येथील अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय येथे कायाचिकित्सा विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले डॉ. अविनाश जाधव यांना आयुर्वेदा टीचर असोसिएशनद्वारा दिला जाणारा ‘बेस्ट यु.जी. टीचर (कायाचिकित्सा) पुरस्कार नुकताच पुणे येथे विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रघुराम भट्ट, चेअरमन, मुल्यांकन बोर्ड भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली, मा. आ.जयवंत आसगावकर, शिक्षक पदवीधर मतदार संघ, डॉ. रमन घुंगराळकर, संचालक आयुष विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, डॉ. मिलिंद आवारे, अधिष्ठाता, आयुर्वेद विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक हे उपस्थित होते.
या सन्मानाबद्दल मांची हिल संस्थानचे संस्थापक शाळीग्राम होडगर साहेब, विश्वस्त डॉ. शैलेन्द्रसिंह होडगर, डॉ. दिग्विजयसिंह होडगर, अध्यक्ष विजय पिसे, संचालिका नीलिमा गुणे, उपाध्यक्ष अण्णासाहेब बलमे, प्राचार्य डॉ. श्यामल निर्मळ, विभागप्रमुख डॉ. संजीव लोखंडे, डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. चंद्रकांत गिरगुणे, डॉ. जितेंद्र शिंपी, हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी दत्ता शिंदे, डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. वाघमोडे आदिंनी डॉ. जाधव यांचे विशेष अभिनंदन केले आहे. मांची हिल परिवाराकडून डॉ. जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.