पाथर्डी l झुंजार न्यूज
कासार पिंपळगाव श्रीदादापाटील राजळे शिक्षण संस्था संचलित लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी आदिनाथनगर येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले प्रा प्रदीप देशमुख यांना सनराईज युनिव्हर्सिटी अलवर राजस्थान यांच्याकडून नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली.

प्रा प्रदीप देशमुख यांनी पीएचडी साठी “इनफ्लूएन्स ऑफ समफायटो कॉन्स्टिट्यूएन्टस ऑफ फार्माकोलॉजिकल इंटरेस्ट ऑन कुटॅनिअस उन्ड इन डायबेटीकरॅट अ नेटवर्क फार्माकोलॉजी इंटिग्रेटेड ऍप्रोच” या शीर्षकांतर्गत संशोधन करून विद्यापीठास शोधनिबंध सादर केला होता.

त्यांच्या या शोधनिबंधास मार्गदर्शक म्हणून डॉ.धिरेंद्र बाबजी संघई यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या या मिळालेल्या यशाबद्दल श्रीदादा पाटील राजळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब (काका) राजळे ,आमदार मोनिकाताई राजळे, राहुल दादा राजळे ,जे आर पवार ,आर जे महाजन, भास्करराव गोरे ,रामकिसन काकडे ,डॉ.राजधर टेमकर ,प्रा.काळे सर ,प्रा.सुनील पानखडे तसेच श्रीदादापाटील राजळे शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी डॉ.प्रदीप देशमुख यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
