पाथरे | झुंजार न्यूज

 

 

सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळीचे बीज रोवून समाजातील सर्व वर्गाला ख-या अर्थाने आधार निर्माण करुन दिला. सहकार चळवळ ही शेतक-यांची असली तरी या चळवळीने ग्रामीण भागाच्या परिवर्तनात निर्माण केलेले स्थान खुप महत्वपूर्ण आहे. सहकारातून निर्माण झालेली शिक्षण व्यवस्था ही ग्रामीण भागातील मुलांच्याु उत्कर्षासाठी महत्वपूर्ण ठरल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केले .

 

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची १२४ वी जयंती सोहळ्याचे औचित्य साधून पाथरे बु॥ येथील श्री छत्रपती शिवाजी विदयालय व कनिष्ठ विदयालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज, सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या तैलचित्रांचे अनावरण, खोखो क्रीडांगणाचे उद्घाटन व विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्काराप्रसंगी डॉ सुजय विखे पाटील बोलत होते . 

 

तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ राजेंद्र कोबरणे , स्कुल कमिटी उपाध्यक्ष आबासाहेब पा घोलप संरपच उमेश पा घोलप , प्रवरा बँक संचालक गंगाधर पा.घोलप , कृउबास उपसभापती आण्णासाहेब पा कडू ,भाऊसाहेब पा घोलप , अशोकराव पा. कडू , दिनकर पा. घोलप , शिवाजी पा. घोलप, उपसंरपच आरिफभाई शेख , नामदेव तांबे , सोपान पा. घोलप , रायभान पा.सिनारे , बाळासाहेब पा. घोलप , राजेंद्र पा. घोलप , ज्ञानेश्वर पा.कडू ,सयाजी पा.कडू , किशोर कडू , अशोकराव पा.घोलप , सत्यजित पा. घोलप , प्रवीण पा. घोलप , दत्तात्रय पा.कडू , मुस्ताक भाई शेख , शिराजभाई शेख , नंदकिशोर पा.कडू , शिवाजी पा.घोलप , दिलीप पा.घोलप , राजेंद्र पा.घोलप , प्राचार्य बारगुजे आदीसह शिक्षक- शिक्षिका, विद्यार्थी- विद्यार्थिनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी डॉ विखे पाटील पुढे म्हणाले की , समाजातील सर्व मुलांना केजी पासून ते पी जी पर्यतचे शिक्षण सुरु झाल्याामुळेच आज लाखो विद्यार्थी या शैक्षणिक संकुलातून देशाच्या काना कोप-यात आपले यश सिध्द करुन दाखवित आहेत. हीच सहकार चळवळीची यशस्वी‍ झाली . तर ग्रामीण भागाच्या समृद्धीकरीता पद्मश्रींनी दिलेला संदेश पुढे घेवून जाण्यांचे काम या पिढीला करावे लागेल. पद्मश्रींनी शेती सहकार शिक्षण औद्योगिक विकास यामधील असणारे योगदान विद्यार्थ्यांसमोर मांडताना पद्मश्रीचे जीवन कसे प्रेरणादायी आहे व कष्टाशिवाय यश नाही हे विद्यार्थ्यांना पटवून दिले तर पद्मश्री विखे पाटील सारखे नेत्रदीप यश संपादन करण्याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.  

 

यावेळी संरपच उमेश पाटील घोलप यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज, नामदेव तांबे यांनी पद्मश्री विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे तैलचित्र तसेच इंजिनिअर सागर सुरेश घोलप यांनी महाविद्यालयास ६ फॅन सप्रेम भेट दिले.

 

 
प्राचार्य बारगुजे यांनी प्रास्ताविक केले.  

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *