{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

पानोडी l झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात विदयालयात भाऊ – बहिण या प्रेमाच्या नात्याचा असणारा ‘ रक्षाबंधन ‘ व सरदार शिवराव भवानराव थोरात यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा करण्यात येवून विविध सांस्कृतिक व क्रिडा कार्यक्रम घेण्यात आले . 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुल विदयापिठाचे माजी प्राध्यापक भवानराव थोरात हे होते . तर स्कुल कमिटी अध्यक्ष विनायकराव थोरात , संरपच गणपत हजारे , उपसंरपच विक्रम थोरात , सोसायटी चेअरमन बबनराव कराड , विठ्ठलराव घोडेकर , तुकाराम पाबळ , आनंदा तळेकर , गफले , मुख्याध्यापक सोनवणे , गणेश जाधव , अशोक भारती , घाडगे आदीसह शिक्षक , पालक व विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी भवानराव थोरात म्हणाले , सरदार थोरातांनी जाती – भेद न करता माणुस न माणुस जोडण्याचे काम केले विदयार्थी हा शिकला पाहिजेल व संघटीत झाला तरचं त्याचा विकास होतो .
विनायकराव थोरात म्हणाले की , सरदार थोरात हे करारी स्वभावाचे होते ध्येय , उदिष्ट ठेवूनचं त्यांनी सामाजिक राजकारण केले . अहमदनगर जिल्हा लोकल बोर्डचे ते पहिले अध्यक्ष राहिले त्यांनी तेव्हा पासून शिक्षण धोरण ठेवून अनेकांना शैक्षणिक प्रवाहात आले आजच्या विदयार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण केल्यास विदयार्थी निश्चित यशस्वी होईल .
यावेळी रक्षाबंधनाच्या सणानिमित्ताने मुलीनी मुलांना व पाहुण्यांना राख्या बांधत एकोप्याचे प्रतीक दाखविले तर या कार्यक्रमात रस्सीखेच, लिंबू चमचा, व पोते शर्यत यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धांमुळे कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन जी पी जाधव यांनी केले होते 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *