{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

ग्रामीण भागात असूनही राष्ट्रीय पातळीवर गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाने नावलौकिक मिळवलेल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फेरो सिमेंट यांच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील डिझाईन व नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एक दिवशीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी अमृतवाहिनी मध्ये विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मिळणारे प्रोत्साहन कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन फेरोसिमेंट सोसायटीचे अध्यक्ष पद्मनाभ लेले यांनी काढले आहे.

 

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल विभाग व फेरो सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम ए वेंकटेश हे होते. तर व्यासपीठावर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,डॉ जे बी गुरव, गिरीश सांगळे चंद्रमोहन हंगेकर, दीपक कान्हेरे विजय वाघे विभाग प्रमुख डॉ एस बी कांडेकर समन्वयक डॉ ए.जे. मेहेत्रे आदी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना लेले म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी संस्थेत संशोधनाला मोठा वाव दिला जात आहे.फेरो सिमेंट हा सर्वात जुना प्रकार आहे सामान्यतः बोटी, पाण्याच्या टाक्या, गार्डन बेंच, मंदिराचे कळस, बंधारे, छप्पर बांधण्यासाठी पातळ कॉंक्रीटचा हा एक प्रकार आहे. त्याची उच्च शक्ती व टिकाऊ पणा जास्त असून आरसीसी मुळे हा प्रकार मागे पडला आहे .हलके स्वरूप आणि सामग्रीचा कमीत कमी वापर यामुळे हा एक पर्यावरण पूरक पर्याय बनतो . सिव्हिल विभागाच्या वतीने संशोधनासाठी अमृतवाहिनीतून होत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले असेही ते म्हणाले

 

तर हंगेकर म्हणाले की बहुमजली पूल ,पोहोचण्याचे तलाव, पाण्याच्या टाक्या, नाट्यगृह, आदींच्या बांधकामांमध्ये फेरो सिमेंटचा वापर होत असून कमी वेळात कमी खर्चात कमी भांडवलामध्ये बांधकाम करता येते

 

 

तर डॉ व्यंकटेश म्हणाले की, बांधकाम व्यवसायात नव्याने मोठी संधी असून अभियंत्यांनी नवीन तंत्रज्ञाचा व संशोधनाचा वापर केल्यास त्यांच्या कामास मोठी मागणी असणार आहे .

 

 

या कार्यशाळेत 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *