{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

पद्मश्री विठ्ठल राव विखे पाटील यांनी सहकार शिक्षण आरोग्य व बँकिंग क्षेत्रात केलेले उल्लेखनीय काम आजच्या समाजाला खऱ्या अर्थाने दिशादर्शक आहे असे स्पष्ट मत भारतराव पाटील गीते यांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची 124 वी जयंती पिंपरी लौकी अजमपुर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय मध्ये साजरी करण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते

 

 

 

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब मुंडे होते तर व्यासपीठावर सरपंच उपसरपंच विकास सोसायटीचे चेअरमन स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष सह सर्व सल्लागार समितीचे सदस्य ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी आदीसह मान्यवर उपस्थित होते

 

 

याप्रसंगी गिते बोलतानी म्हणाली की आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवारानगर येथे पद्मश्रींनी सुरू करून खऱ्या अर्थाने देशाला सहकार काय असतो हे दाखवून दिले त्यांनी सहकाराच्या माध्यमातून शिक्षण संस्था आरोग्य बँकिंग क्षेत्रात मोठे काम करून सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा कसा होईल या हेतूने काम केल्यामुळे आजही शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य माणसाला याचा फायदा होत आहे त्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यामुळे आजही ग्रामीण भागातला विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर काम करीत आहे त्यांच्या या परमोच्छ कामाचा वारसा त्यांचे पुत्र स्वर्गीय पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटील तसेच राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या हितासाठी अहोरात्र हा वारसा पुढे चालवला त्यामुळे ग्रामस्थांनी शाळा ही मंदिर असून ती मंदिर जपण्याचं काम सर्व ग्रामस्थांनी युकोपाने करावे असे आव्हान करून त्यांनी शाळा ही वाघिणीचे दूध असून आज जर आपल्या घरातला एक मुलगा शिकून नोकरीला लागला तर त्या घराचा कायापालट होतो तेव्हा या मंदिरातील जिवंत देव जपण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात शाळांना मदत करावी असे आव्हान केले आणि जर आपण शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यानंतर केले तर खऱ्या अर्थाने पद्मश्री च्या केलेल्या कामाच्या पावलावर काम केल्याचं खऱ्या अर्थाने त्यांच्या साजऱ्या करणाऱ्या जयंती विनम्र विनम्र अभिवादन ठरेल असाविश्वास त्यांनी व्यक्त केला

 

 

याप्रसंगी विद्यार्थ्यांची मनोगत व्यक्त होऊन विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाला मान्यवरांच्या हस्तेबक्षीस वितरण करण्यात आले

 

प्रस्तविक मुख्याध्यापक तायगाशिंदे यांनी केले तर आभार श्री मेहेर सर यांनी मांडले .

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *