{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

 

 

शिक्षण हे वाघिणीचे दूध असून शिक्षणामुळे सर्वांची प्रगती होते एक घरातील शिकून चांगल्या नोकरीला लागला तर त्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास होतो त्यामुळे शाळा हे मंदिर असून या मंदिरातील जिवंत देव व त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामस्थांनी आपापसातील मध्ये विसरून एकत्र येऊन शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपला बहुमूल्य वेळ द्यावा असे मतसामाजिक कार्यकर्ते व जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भारतराव गीते यांनी व्यक्त केले

 

 

 

ते प्रवरा माध्यमिक विद्यालयाच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू केलेल्या खोलीच्या बांधकामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होतेयाप्रसंगी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष उपाअध्यक्ष सर्व स्था सल्लागार समिती सदस्य विकासो चेअरमन मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद्य गावातील सर्व स्तरातील ग्रामस्थ उपस्थित होते .

 

ते पुढे बोलताना म्हणाले की आज स्पर्धेच्या युगामध्ये शिक्षण हा महत्त्वाचा विषय असून सध्या देशामध्ये शिक्षणाकडे सर्व दुर दिले जाते .आजही शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या एम पी एस सी यु पी एस सी परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर चमकत आहे त्यामुळे यापुढेही शिक्षणाच्या माध्यमातून चिमुकल्यावर होणारे संस्कार व त्यातून मिळणारे शिक्षण सुख सुविधा डिजिटल शाळा तसेच विद्यार्थ्यांना वाचनासाठी जनरल नॉलेजचे पुस्तके उत्तम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली आहे आपण आपापसातील मध्ये हेवेदावे दूर करून शाळेच्या सार्वजनिक विकासासाठी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना ग्रामस्थांच्या सहकार्यातून काय करता येईल याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे भविष्य काळामध्ये शिक्षण क्षेत्रात वाढणारी स्पर्धा खाजगी शाळांची वाढती स्पर्धा यामध्ये सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर गोरगरीब यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळा व गावातील विद्यालयामार्फत उच्च प्रतीचे शिक्षण मिळण्यासाठी त्यांना लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी ग्रामनिधीतून ग्रामस्थांनाही येतेम्हणून ती जबाबदारी ग्रामस्थ यशस्वीपणे पूर्ण करतील याचा मला विश्वास आहे असे ग्रामस्थांच्या सहकार्याची त्यांनी मनापासून आभार मानले .

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed