ग्रामस्थांच्या मागणीवरून सातत्याने दरवर्षी पाणी मिळत आहे कुणीही श्रेय घेऊ नये, नागरिकांची आवाहन
संगमनेर । झुंझार न्यूज
अंभोरे पिंपरने परिसरातील शेतकरी व नागरिकांना उन्हाळ्यामध्ये पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मागील 25 वर्षापासून दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अंभोरे धरणा मधून देव नदीमध्ये पाणी सोडले आहे. याला सर्व जनता साक्ष असून कोणीही पत्रक बाजी करून श्रेय घेऊ नये असे आवाहन माजी सरपंच भास्कर खेमनर व अंभोरे ग्रामस्थांनी केले आहे.

अंभोरे ग्रामस्थांनी म्हटले आहे की लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने अंभोरे गावाला दरवर्षी अंभोरे धरणातून पाणी दिले आहे. उन्हाळ्यामध्ये पिंपरणे व अंभोरे येथील ग्रामस्थांच्या मागणीवरून देव नदीमध्ये पाणी सोडण्यात येत होते. यासाठी स्वर्गीय सोपान बिरू खेमनर, स्वर्गीय सुंदर जगनर, कै. मंजाबापू खेमनर, त्यानंतर ज्येष्ठ कार्यकर्ते लहानु भिमाजी खेमनर, रामदास केरू खेमनर, यांनी कायम हे पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा केला. सोपान बिरू खेमनर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी शिष्टमंडळ भेटायचे याबाबतची सर्व माहिती कार्यकारी अभियंता यांना आहे. त्यांनी काम केले मात्र याची कधीही प्रसिद्धी त्यांनी केली नाही. गावकऱ्यांसाठी मागील 25 वर्षापासून अंभोरे धरणातून दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी सोडण्यात येत आहे. हे सर्व शेतकरी, अंभोरे आणि पिंपरने ग्रामस्थ यांना माहित आहे.

भास्करराव खेमनर हे गावचे सरपंच असताना या दोन गावांसाठी या धरणातून एस्केप ठेवला गेला. त्यामुळे देव नदीमध्ये सहज पाणी येत आहे. या एस्केप मुळे पुढील अनेक वर्षांची सोय भास्कर खेमनर यांच्या सरपंच पदाच्या काळामध्ये या दोन्ही गावातील नागरिकांची करण्यात आली.
मात्र ज्यांना आता अंभोरे धरण माहित नाही अशी मंडळी पाणी सोडण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी सोडण्याची परंपरा कायम आहे. या कामाचे कुणीही श्रेय घेऊ नये असे आवाहन अंभोरे व पिंपरने ग्रामस्थांनी व तरुणांनी केले आहे.

