{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

 

महाविद्यालयाला हॅकॅथॉनमध्ये आतापर्यंत ७.५ लाख रुपयांचे बक्षीस-  प्राचार्य डॉ. एम . ए. वेंकटेश

 

 

संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

 

 

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय गेली ४१ वर्षे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्य विकासासाठी नवनवीन उपक्रम महाविद्यालय द्वारे सतत राबविले जातात. एआयसीटीई व एचआरडी मंत्रालय दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठी डिजीटल उपक्रम स्पर्धा गेली ७ वर्षापासून आयोजित करण्यात येते. महविद्यालयातील १५० संघाने सहभाग नोंदवला आहे . महाविद्यालयाला २०१८ मध्ये ५० हजार रु. चे  तसेच २०२० मध्ये डीआरडीओ कडून रुपये १ लाखाचे प्रथम आणि सलग तिसऱ्यांदा २०२२ मध्येही रुपये १ लाखाचे प्रथम तसेच आंतरराष्ट्रीय हॅकॅथॉन मध्ये USD $ १६०० व $ ६०० आणि २०२२ मध्ये रु. ३ लाखचे पारितोषिक मिळाले आहे. सलग ७ वर्षे महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक ह्या स्पर्धेत सहभाग नोंदवत आहे. उत्कृष्ट उकल व संशोधन असणाऱ्या संघाला अंतिम फेरीत सहभागी होता येते, अशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश यांनी माहिती दिली .

 

 

 

 

एआयसीटीई व एचआरडी मंत्रालय भारत सरकार यांच्या नियमावली नुसार इंटरनल हॅकॅथॉन फॉर स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन  २०२४  हि स्पर्धा २९ व ३० ऑगस्ट, २०२४  रोजी घेण्यात आली. स्पर्धेमध्ये  ६६ संघ आणि ३९६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी ३० संघांची सॉफ्टवेअर व हार्डवेयर एडीशनसाठी निवड करण्यात आली.  ह्या स्पर्धेसाठी  तेजस बिडवाई (सॉफ्टेवर इंजिनियर, क्रॉस कंट्री , पुणे) व श्रीश सिंघ (सिनियर  सॉफ्टेवर  डेव्हलपर्स, केनेक्ट टेकनॉलोजी, मुंबई)  स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन  २०२० व २०२२ चे विजेते परीक्षक म्हणून लाभले. स्पर्धेसाठी सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, अशी माहिती संगणक अभियांत्रिकी चे विभाग प्रमुख डॉ. एस. के. सोनकर यांनी दिली.

 

 

 

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. सुमेधा कर्पे व सार्थक भलगट यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे छायाचित्रण कु. ओंकार  राजळे व आदित्य निवडूंगे, रोहन रौन्दल यांनी केले. अंतरमहाविद्यालयीन हॅकॅथॉन स्पर्धेचे आयोजन संगणक विभागातील प्रा. विक्रम अभंग , डॉ. स्वाती भोंडे व प्रा. कविता रहाणे  यांनी केले. कार्यकर्माचे आभार प्रदर्शन हॅकॅथॉनचे समन्वयक प्रा. विक्रम अभंग यांनी केले.

 

 

 

हॅकॅथॉन स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात , विश्वस्त डॉ. सुधीरजी तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर अकॅडेमिक्स डॉ. जे. बी. गुरव , प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, रजिस्ट्रार प्रा. व्ही.पी. वाघे आणि संगणक विभाग प्रमुख डॉ. एस.के.सोनकर व सर्व शिक्षक – विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed