{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

आश्वी l झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील मांची हिल येथील अश्विन औषधनिर्माणशास्र महाविद्यालयातील तृतीय वर्ष बी. फार्मसीमधील ५० विद्यार्थ्यांनी वाळुंज ,एमआयडीसी , छत्रपती संभाजीनगर येथील ‘रेड क्रॉस फॉर्म्युलेशन’ या कंपनीला नुकतीचं भेट दिल्याची माहिती प्राचार्य डॉ. एन.बी.आहेर यांनी दिली. 
फार्मसी क्षेत्र हे झपाट्याने विकसित होत असून महाविद्यालयीन अभ्यासक्रम व औद्योगिक क्षेत्र यांची सांगड घालून विद्यार्थ्यांना फार्मा कंपनीमधील विविध विभागांची माहिती होणे हे आवश्यक आहे. त्यानुसार अश्विन कॉलेज ऑफ फार्मसी मांची हिल अंतर्गत ‘रेड क्रॉस फॉर्म्युलेशन’ वाळुंज, एम.आय.डी.सी., छत्रपती संभाजीनगर येथे क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. 
कंपनीचे मुख्य व्यवस्थापिक संचालिका कोरडे व्ही. आर. व प्लांट हेड कोरडे राहुल यांनी कंपनीत होणाऱ्या उत्पादनाविषयी आणि कंपनीतील विविध विभागामध्ये चालणाऱ्या प्रक्रीयांबाबत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना सी.जी.एम.पी. (Current Good Manufacturing Practices & National, International Company Audit बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष क्षेत्रभेटी व अद्यावत तंत्रज्ञानाविषयी माहिती घेणे गरजेचे आहे. हि गरज ओळखून कॉलेज तर्फे औद्योगिक क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. 
या औद्योगिक क्षेत्र भेटीमध्ये फार्मा फिल्ड मधील उपलब्ध होणाऱ्या नोकरी विषयक संधी बघता अश्विन कॉलेज ऑफ फार्मसीने ‘रेड क्रॉस फॉर्म्युलेशन’ या कंपनी सोबत समंजस (MOU) करार केला. औद्योगिक क्षेत्रभेटीनंतर छत्रपती संभाजीनगर परिसरातील प्रेक्षणीय स्थळे ‘बीबी का मकबरा’, दौलताबाद , देवगिरी गड परिसरातील औषधीय वनस्पतींचा अभ्यास केला. या औधोगिक क्षेत्र भेटीसाठी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. मनकर एस. पी., सौ डांगे एस.एस., सौ मगर एम.एम. प्रा. साबळे एस.बी. व अधिक्षक मांढरे ए.एन. यांनी सहभाग घेतला. 
या यशस्वी क्षेत्र भेटीबाबत संस्थेचे संस्थापक अॅड. शाळीग्राम होडगर , अध्यक्ष विजय पिसे, संचालक नानासाहेब वडीतके, सेक्रेटरी श्रीमती.निलिमा गुणे, प्राचार्य डॉ. नितीन आहेर, उपप्राचार्य धनंजय देशमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed