{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

पानोडी । झुंजार न्यूज 

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सुदाम सांगळे यांच्या वस्तीवरील श्री कृष्ण मंदिरांमध्ये बालपन इग्लिश स्कूलच्या बाल गोपाळांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दंही हंडीचा कार्यक्रम साजरा केला . 

 

 

दरवर्षाप्रमाणे बालपन इग्लिश स्कूलच्या बाल गोपाळांनी पारंपारिक वेष भूषा परिधान करुन सांगळे वस्तीवरील श्री कृष्ण मंदिरात येवून श्री कृष्णाच्या मुर्तीची पुजा करुन आपल्या कला गुणाचे विविध रुप साजरे केले . जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. दहीहंडीच्यावेळी बाल गोपाळाचा संघ तयार करून दंही हंडी फोडण्यात आली .
श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून बालपन इग्लिश स्कूलच्या बाल गोपाळांच्या सानिध्यात दहीहंडीचा उत्सव साजरा केला असल्याचे सुदाम सांगळे यांनी सांगितले .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed