पानोडी l झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सहकार तत्वावर चालणाऱ्या विविध संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कर्जवाटप , भरणा , दूधात वाढ आदी विषयावर झालेल्या चर्चेतून मोठया उत्साही वातावरणात संप्रन्न झाल्या .

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील व कै . शिवाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांची केंद्र बिंदू असणाऱ्या पानोडी विविध कार्यकारी सोसायटी , दूध संस्था व पतसंस्थेचा स्वच्छ व पारदर्शक कारभार करत होत असून सभासदाच्या विश्वासाला पात्र ठरणारे संचालक मंडळ हे काम करत आहेत . नुकत्याचं झालेल्या या तिन्ही सहकारी संस्थेचा वार्षिक सर्वसाधारण सभा संप्रन्न झाल्या .

यावेळी सोसायटी सचिव प्रविण आव्हाड , पतसंस्था मॅनेजर कैलास नागरे , दूध संस्था सचिव एकनाथ खेडकर यांनी संस्थेच्या प्रस्तावनातून संस्थेची आर्थिक आराखडा मांडला .

यावेळी राजहंस दूध संघाचे संचालक विक्रम थोरात म्हणाले की , कै शिवाजीराव थोरात यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून पतसंस्था , दूधसंस्था उभारल्या . आज पानोडी व परिसरातून दूध व्यवसाय व विविध उदयोग धंन्दांच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे तर सभासदाच्या विश्वासहर्तातून सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी कर्ज पुरवठा केला गेला तर सोसायटी ही अमृत महोत्सवी वाटचालीत पर्दापण करणार असल्याचे विनायक थोरात यांनी सांगितले .

यावेळी सोसायटी चेअरमन बबनराव कराड , व्हा चेअरमन कारभारी जाधव , दूधसंस्था चेअरमन गणेश जाधव , व्हा चेअरमन भिमराज खैरे , पतसंस्था चेअरमन माणिक पाबळ , व्हा चेअरमन सोपान सूळ , संगमनेर दूध संघ संचालक विक्रम थोरात , माजी उपसंरपच विनायकराव थोरात , माजी उपसंरपच नानासाहेब शिंदे , सूर्यभान थोरात , बळवंतराव थोरात , रामराव पवार , आबासाहेब जाधव , संपत तळेकर , विठ्ठल घोडेकर , मच्छिद्र मुंढे , गोपाळराव थोरात , संतोष सांगळे , मारुती पाबळ , संदिप थोरात , बाळासाहेब तळेकर , दत्तु चव्हाण , बाळासाहेब नागरे , आदीसह संचालक , सभासद मोठया संख्येने उपस्थित होते .
