संगमनेर l झुंजार न्यूज
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांच्या नेतृत्वाखाली नितीन साळवे यांची अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.

गेली अनेक वर्ष काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या विविध पदावर काम करणारे आणि मोठे बंधू सचिन साळवे माध्यमातून कायम लोकांचे विषय केंद्रस्थानी मांडणारे नितीन साळवे यांची निवड अतिशय महत्त्वाची समजली जाते. काँग्रेसचे विचार तळागाळातील, शोषित वंचित समूहापर्यंत पोहोचवण्याचं काम ते अत्यंत प्रामाणिकपणे करतील असा अशी जबाबदारी नितीन साळवे यांच्यावर जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांनी सरचिटणीस पदाचे पदाची जबाबदारी सोपवली आहे.

यावेळी त्यांच्या निवडीचे अभिनंदन माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री थोरात, शिवसेनेचे सचिन साळवे अरुण गावित्रे, कमलेश गायकवाड,आदींनी यावेळी त्यांच्या निवडीचे अभिनंदन केले.

