{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

संगमनेर l झुंजार न्यूज 

 

 

राष्ट्रीय काँग्रेसचे नेते ,लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल सोशल मीडियावर बेताल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे सरकारमधील शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ आज संगमनेर उपविभागीय प्रांताधिकारी यांना जिल्हा काँग्रेस तर्फे निवेदन देवून निषेध नोंदवण्यात आला.

 

 

 

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांचा जाहीर निषेध व्यक्त करून निवेदन सादर करण्यात आले.

 

यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बंटी यादव, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गावित्रे,तालुकाध्यक्ष विजय शेळके, जिल्हा सरचिटणीस रामनाथ गायकवाड, सरचिटणीस रवींद्र शिंदे, विनोद गायकवाड, शहर कार्याध्यक्ष सुरेश खामकर, श्रावण गायकवाड,
आव्हाड,विलास गायकवाड, उत्तम गायकवाड,सोमनाथ पवार उपस्थित होते.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed