संगमनेर l झुंजार न्यूज

 

मा. शिक्षण मंत्री तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने पुणे विद्यापीठाच्या युवक महोत्सवात विविध विभागात प्राविण्य मिळून उत्तुंग भरारी मिळवली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील यांनी दिली आहे.

 

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व संगमनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय युवक महोत्सव जल्लोष २०२४ आयोजित करण्यात आला. या युवक महोत्सवाअंतर्गत संगीत, नृत्य, थिएटर, साहित्य, ललित कला याविषयी एकूण 27 प्रकारच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाने सांघिक उपविजेतेपद पटकावले तसेच १० विविध स्पर्धा प्रकारांमध्ये देखील पारितोषिक मिळविले.

 

या महोत्सवामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील १००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या महोत्सवामध्ये महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन १० स्पर्धा प्रकारांमध्ये यश संपादन केले. यामध्ये समृद्धी अभंग, समृद्धी आवारी, सृष्टी घोसाळे यांनी भारतीय समूह गायन, कावेरी बोराडे, कार्तिक सोनवणे, प्रसाद लोंढे यांनी पाश्चिमात्य समूह गायन, ऋतुजा पोकळे-कोलाज, अकसा शेख-मेहंदी, प्रतीक भराडे-भारतीय तालवाद्य वादन, सायली गायकवाड, स्वयम गीते, अश्विनी जगदाळे, पौर्णिमा दिघे, पूर्वा शिरसाठ, मकरंद जगताप, अभिजीत शहाणे-स्कीट, स्वयं गीते, अश्विनी जगदाळे, सुदर्शन सानप, अंकिता गोडगे, पूर्णिमा दिघे, पूर्व शिरसाट-मूक नाटिका, श्रद्धा घोटेकर-कार्टूनिंग, प्राची डेरे-रांगोळी, अवेश शेख फोटोग्राफी या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक यश संपादन केले.

 

या स्पर्धेत सहभागी सर्व यशस्वी स्पर्धांकांचे सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे मार्गदर्शक आ.बाळासाहेब थोरात, संस्थेचे चेअरमन मा.आ.डॉ. सुधीर तांबे, सेक्रेटरी लक्ष्मणराव कुटे, सह-सेक्रेटरी दत्तात्रय चासकर, प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, उपप्राचार्य डॉ. विलास कोल्हे, डॉ. लक्ष्मण घायवट, प्रशासन अधिकारी  गोरक्षनाथ पानसरे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, महाविद्यालयीन सेवक वृंद, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी सांस्कृतिक समन्वय प्रा. नानासाहेब गुंजाळ, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. जयराम डेरे, प्रा. अवधूत पाटील, डॉ. दिपाश्री गडाख व कला मंडळातील सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *