{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

आश्वी l झुंजार न्यूज

अंगणवाडी केंद्रातुनच नवजात बालकांना पोषण आहारासोफतच अक्षर ओळख व त्यामाध्यमातुन पुढील शाळेची ओढ लावली जाते.तर माता बालसंगोपनाच्या माध्यमातुन गरोदर माता व किशोरवयीन मुलींना पोषक आहारा सोबतच नित्यनेमाने तपासणी, वजन ,असे अनेक उपक्रम राबविले जातात.सोबतच एकात्मिक बालविकास प्रकल्पा अंतर्गत आयोजीत करण्यात येणा-या मेळाव्यातुन महिला सक्षमीकरणातुन आत्मनिर्भर महीला असे अनेक उपक्रम राबविले जातात.त्यामुळे प्रत्येक ग्रामवासियांनी आपल्या बालकांना नियमित अंगणवाडी मध्य पाठवावे,कारण अंगणवाडीतुनच माता बालसंगोपन व किशोरवयीन मुलींची काळजी घेतली जाते असे आवाहन उपसंरपच सौ अरुणाताई विजय हिंगे यांनी केले .
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु॥ येथील गायकवाडवस्ती वरील अंगणवाडीत माता – पालक मेळावा व पालकाकडून अंगणवाडीतील चिमुकल्यांसाठी विविध विविध भेट वस्तू देण्यात आल्या महिला मेळावा कार्यक्रम घेण्यात आला . 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संरपच नामदेव शिंदे हे होते तर कृउबास उपसभापती गिताराम गायकवाड , बालविकास प्रकल्प अधिकारी राऊत , सुपरवाइझर सौ शितल पाटील , पत्रकार डॉ रामनाथ जऱ्हाड , तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड , जि प माजी सदस्य अॅड. रोहिणी निघुते , भाऊराव गायकवाड , ग्रा प सदस्य बाळू मदने, अविनाश गायकवाड, संतोष ताजणे ,  बबनराव शिंदे , विजय म्हसे , बाळू होडगर , रणजित गायकवाड , सोसायटी चेअरमन मच्छिद्र गायकवाड , गोकूळ ताजणे , बबनराव खेमनर  , नामदेव मांढरे , खेमनर सर , राहुल शिंदे , शिवराम ताजणे , गोरक्षनाथ म्हसे , गणेश म्हसे अंगणवाडी सेविका मंगल गायकवाड , मदतनीस निता गायकवाड आदीसह सर्व अंगणवाडी सेविका , मदतनिस , आशा सेविका , शिव छत्रपती व संगम गणेश मंडळाचे कार्यकर्ते , महिला मोठया संख्येने उपस्थित होते .
या मेळाव्याचे सुत्रसंचालन अंगणवाडी सेविका मंगल गायकवाड व मदतनीस निता गायकवाड यांनी केले तर महिला , प्रोढ मुली, अंगणवाडीतील शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी रांगोळी स्पर्धा , संगीत खुर्ची , गीत गायन समूहगीत , डान्स स्पर्धा आदीसह विविध स्पर्धेत भाग घेतला तर स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वांना बक्षिसे देण्यात आले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *