पानोडी l झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालयात आरोग्य , शिक्षण व मुलीची सुरक्षितता विषयावरुन माता – पालक सभा मोठ्या उत्साहात संप्रन्न झाला .

या सभेच्या अध्यक्षस्थानी आशा सेविका सौ. शोभा राजेश गायकवाड या होत्या . तर प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल साहेबराव शेळके , सुभेदार मेजर बाळशिराम झिटे , माजी उपसंरपच विनायकराव थोरात , अंगणवाडी सेविका सौ.वंदना चव्हाण , सौ वनिता जाधव , सौ ज्योती कदम , सौ प्रियंका कराड , सौ कल्पना घुगे , सौ लता तांबे , सौ सविता पाबळ , सौ उषा शेवाळे मुख्याध्यापक पी व्ही सोनवणे , गणेश जाधव आदीसह मोठ्या संख्येने माता – पालक , शिक्षक विदयार्थी उपस्थित होते .

यावेळी सौ शोभा गायकवाड म्हणाल्या की , मुलीनी आपल्या आरोग्याची काळजी घेताना पाल्याभाज्या व फळ हे जास्त प्रमाणात खावून आपल्या शरिराची काळजी घ्यावी सातत्याने व्यायाम व स्वच्छतेवर भर दयावा आरोग्य ही आपली खरी संपत्ती असून पालकांनी आपल्या मुलीकडे लक्ष्य देवून त्यांच्याशी मैत्रीपुर्ण चर्चा करावी तर सौ वंदना चव्हाण यांनी आरोग्य व पोषण अभियानबाबत माहिती दिली तर सौ वनिता जाधव यांनी संध्या मुलीच्या बाबत विविध घडणाऱ्या घटना बाबत चिंता होत असून मुलीनी होणाऱ्या अत्यचाराबाबत स्वतः सक्षम होवून आपले संरक्षण करावे . तर सौ. ज्योती कदम यांनी मुलींना जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्वतःहून प्रेरित व्हावे .

यावेळी स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष विनाययक राजे थोरात यांनी मुलींच्या संरक्षणासाठी जे जे करणे शक्य आहे ते करण्यात येईल असे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुनिता मुन्तोडे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक पी.व्ही. सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन घाडगे यांनी केले, तर आभार के.पी. वाणी यांनी मांडले .
Post Views: 907
