{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

संगमनेर l झुंजार न्यूज

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र  व जिल्हा क्रीडा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर येथे तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय येथे पार पडल्या. 

       
     
सदर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ४ x १०० मीटर रिले मध्ये १४ वर्ष मुले या गटात हर्षद मोनी राम कवर, हिमेश प्रकाश जाधव, अनिकेत चौरे, अनिकेत धूम व स्वप्नील चौरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

         

४ x १०० मीटर रिले मध्ये १७ वर्षे मुले या गटात गावित नितीन भागवत, उन्मेष मनोहर चौधरी, अतुल आवारी, सावन भरसठ व कल्पेश चौधरी या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ४ x ४०० मीटर रिले मध्ये १७ वर्ष मुले या वयोगटात चौधरी विकास ताराचंद, जयेश प्रकाश तुंगार, धनेश हिरामण बागुल, शेखर गावित, गावित नितीन भागवत यांनी प्रथम क्रमांक मिळविला. व १४ वर्षा खालील मुले १०० मीटर मध्ये हर्षद कवर याने द्वितीय क्रमांक पटकावला. २०० मीटर धावणे स्पर्धेत स्वप्नील चौरे याने प्रथम क्रमांक पटकावला व ४०० मीटर धावणे स्पर्धेत अनिकेत चौरे याने प्रथम पटकावला. १७ वर्षा खालील मुले १०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये उन्मेष चौधरी याने तृतीय क्रमांक पटकावला. ४०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये धनेश बागुल याने द्वितीय क्रमांक पटकावला.. २०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये शेखर गावित याने तृतीय क्रमांक पटकावला व १५०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये जयेश तुंगार याने द्वितीय क्रमांक पटकावला. सदर स्पर्धेत विद्यालयातील वरील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला व जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी आपली निवड निश्चित केली. 
       
 
या विद्यार्थ्यांना  क्रीडा शिक्षक रवींद्र कदम, अतुल गोडबोले तसेच वृषाली भागवत यांचे मार्गदर्शन लाभले. 
       
या सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात. संस्थेचे विश्वस्त आमदार डॉक्टर सुधीर तांबे, उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ पाटील, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, संस्थेच्या विश्वस्त शरयू ताई देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अनिल शिंदे, व्यवस्थापक प्राचार्य व्हि. बि. धुमाळ, विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती शितल गायकवाड मॅडम, सर्व विभाग प्रमुख यांनी कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *