{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणाने अग्रेसर असलेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदेचे (नॅक) ‘A’ ग्रेड मानांकन मिळाले आहे अशी माहिती अमृतवाहिनी एमबीएचे संचालक डॉ.बी.एम. लोंढे यांनी दिली.

 

मा. शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व मा. आमदार डॉ. सुधीर तांबे आणि संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी एमबीएने आपला गुणवत्तेचा लौकिक कायम राखला आहे . राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्याशी असलेल्या समन्वयामुळे एमबीएच्या अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या पॅकेजवर नोकऱ्या मिळाल्या आहेत.

 

 

नॅकच्या माध्यमातून देश पातळीवर उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची गुणवत्ता मूल्यमापन तपासली जाते यासाठी ऑगस्ट २०२४ मध्ये माजी कुलगुरु डॉ. इंदवर्धन त्रिवेदी (राज्यस्थान), डॉ. पल्लाप्पा नागराजु (कर्नाटक) आणि डॉ. सुंदरारमन रामतीर्थन (तिरुचित्रापल्ली) या नॅकच्या तज्ञ समितीने २९ व ३० ऑगस्ट रोजी अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयास भेट देऊन गेल्या पाच वर्षातील शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेची पाहणी केली त्यामध्ये महाविद्यालयातील अभ्यासक्रम, संशोधन व विस्तार कार्य, मूलभूत सुविधा व विद्यार्थी सहाय्य व प्रगती, प्रशासकीय नेतृत्व व व्यवस्थापन, संस्थात्मक मूल्य व नाविन्यपूर्ण उपक्रम आदींची पाहणी करून नॅक समितीने महाविद्यालयास दर्जा बहाल केला आहे.

 

 

त्यानंतर नॅक चे नुकतेच गुणांकन जाहीर झाले त्यात अमृतवाहिनी एमबीएला A ही ग्रेड मिळाली असून महाविद्यालयाचा सीजीपीए ३.१९ एवढा आला आहे.

 

 

या मानांकनामुळे ग्रामीण भागातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नामांकित आणि नॅक चा दर्जा प्राप्त एमबीए महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांना करिअर आणि उच्च शिक्षणासाठी फायदा होणार आहे. नॅक कमिटीच्या मानांकनासाठीआईक्यूएसीालयाचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे आईक्यूएसी कॉर्डिनेटर डॉ. नितेश नायर व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

 

एमबीए महाविद्यालयाच्या या यश प्राप्ती बद्दल मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयू देशमुख, संचालक इंद्रजीत थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक व्ही बी. धुमाळ आणि संस्थेचे डायरेक्टर अकॅडेमिक डॉ. जे.बी.गुरव, संचालक डॉ बी एम लोंढे आदी सह विविध मान्यवरांनी एमबीए महाविद्यालयाच्या सर्व स्टाफचे अभिनंदन केले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *