संगमनेर | झुंजार न्यूज
राज्याचे तथा कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आ. बाळळासाहेब थोरात यांच्या माध्यममातून संगमनेर तालुक्याचा होणारा सर्वागीण विकास हा राज्यात आदर्शयुक्त होत असल्याचे चर्चा होत असून सर्वा समाज्याला बरोबर घेवून जाणारे बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने मिळालेले हे नेतृत्व खऱ्या अर्थाने तालुक्याला मिळालेली एक देणगीचं होय हे म्हणणे वावगे ठरणार नसल्याचे प्रतिपादन संगमनेर तालुका दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले .

लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या संगमनेर तालुक्यातील डिग्रस ते रणखांब रस्ताडाबरीकरण (03 कोटी 53 लाख) , डिग्रस ते दरेवाडी रस्ता डाबरीकरण रस्ता (02कोटी 43 लाख) डिग्रस ते आंभोरे रस्ताडाबरीकरण (40 लाख), शाळा खोल्याचे भुमिपूजन (25 लाख), जाधव वस्ती काशाआई मंदिराजवळ पुल बाधंणे (25लाख), वाचनालय-अभ्यासिका (30लाख)या रस्त्यांचे कामांचे भूमीपूजन राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजितसिहं देशमुख व युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डाॅ.जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी राजहंस दुध संघाचे व्हा.चेअरमन राजेंद्र चकोर ,सिताराम वर्पे , मिनानाथ वर्पे ,राजेंद्र देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी बुवाजीबाबा पुणेकर , उमाजीबाबा पुणेकर , कारभारी खेमनर , पोपट होडगर , शंकर बिडगर ,दामू खेमनर , विठ्ठल नान्नर , सोपान ताबंडे , संपतराव खेमनर , बाळासाहेब होडगर , किसन नागरे , संतोष खरात , संतोष नागरे , नानासाहेब गुजांळ , रावसाहेब खेमनर , रावजी खेमनर , लहानू खेमनर , किसन खेमनर यांच्या प्रमुख उपस्थितीत डिग्रस येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 719

