अजिंक्य रहाणे, झहीर खान यांच्या समवेत चर्चा
संगमनेर । झुंझार न्यूज
नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार तथा संगमनेर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली असून क्रिकेटसह विविध विषयावर चर्चा केली याचबरोबर संगमनेर संगमनेर मध्ये कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण दिले आहे.

संगमनेर तालुक्याचे सुपुत्र अजिंक्य रहाणे यांनी सक्रिय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर मुंबई येथे कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकर, मा. कर्णधार अजिंक्य रहाणे, तेज गोलंदाज झहीर खान यांच्यासह आमदार सत्यजित तांबे संगमनेर शहराच्या नगराध्यक्ष डॉ. सौ मैथिलीताई तांबे व विविध मान्यवर उपस्थित होते.
भारतामध्ये क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ मानला जात असून सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जात आहे. भारतीय क्रिकेटची मोठी सेवा करताना सचिन तेंडुलकर यांनी प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केली असून भारत सरकारने सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने गौरवले आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर येथे मूकबधिर व मतिमंद विद्यालयासाठी सचिन तेंडुलकर यांनी आपल्या खासदार निधीतून 50 लाख रुपयांचा निधी दिला होता.

अजिंक्य रहाणे हे संगमनेरचे सुपुत्र असून संगमनेर तालुक्यातील विविध कार्यक्रमासाठी ते सातत्याने उपस्थित असतात सक्रिय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे यांना त्यांच्या क्रिकेट अकॅडमी साठी निमंत्रित केले होते.
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे सुपुत्र झहीर खान व अजिंक्य रहाणे यांच्या समवेत भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याबरोबर आमदार सत्यजित तांबे यांनी आपुलकीने गप्पा मारल्या याचबरोबर संगमनेरच्या भेटीचे निमंत्रण आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी सचिन तेंडुलकर यांना दिले.
या प्रसंगी बोलताना आमदार तांबे म्हणाले की अजिंक्य रहाणे व झहीर खान यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव क्रिकेटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे या दोन्ही जिल्ह्याच्या सुपुत्रांचा जिल्ह्याला आणि संगमनेर तालुक्याला सदैव अभिमान आहे. सचिन तेंडुलकर हे तर भारतातील प्रत्येकासाठी दैवत आहे. आदर्श व्यक्तिमत्व असलेले तेंडुलकर हे आपले आवडते क्रिकेटपटू असून संगमनेर मध्ये येण्यासाठी त्यांना आपण निमंत्रण दिले आहे.
या कार्यक्रमांमध्ये सचिन तेंडुलकर,अजिंक्य राहणे आणि झहीर खान यांच्यासमवेत आमदार सत्यजित तांबे नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे यांनी क्रिकेटच्या तीन पिढ्यांच्या आठवणी, गप्पा, ग्रामीण व शहरी भागातील क्रिकेट, विविध स्पर्धा याबाबत आपुलकीने मनमोकळेपणाने संवाद केला






