.

संगमनेर | झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील महायुती सरकारने मंजुर केलेल्‍या सुमारे ५४ कोटी रुपयांच्‍या विविध विकास कामांचे भूमीपुजन आणि उद्घाटन महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उस्थितीत आयोजित करण्‍यात आले असून, या निमित्‍ताने महिलांच्‍या भव्‍य मिळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. बचत गटांना साहित्‍याचे वितरण आणि तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस शाहीर विठ्ठल उमप यांचे नाव देण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवार दि.११ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ पासून मंत्री विखे पाटील यांचा मांलुजे येथून दौरा सुरू होणार आहे.केंद्र सरकारच्‍या सहकार्याने महायुती सरकारने सुरु केलेल्‍या जलजीवन मिशन अंतर्गत सुरु केलेल्‍या पाणी पुरवठा योजनांचे दहा गावातील काम पुर्ण झाले असल्‍याने या योजनांचा लोकार्पण सोहळा मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत होणार आहे. या योजनांसाठी सुमारे १२ कोटी ८१ लाख रुपये निधीची उपलब्धता करुन देण्‍यात आली होती .
अर्थसंकल्‍प २०२४ अंतर्गत तालुक्‍यात मंजुर झालेल्‍या सुमारे ३८ कोटी ४५ लाख रुपयांच्‍या रस्‍त्‍यांच्‍या कामांचा शुभारंभ आणि निळवंडे कालव्‍यांवरील पिंपळगाव कोझींरा येथील ८० लाख रुपये किमतीच्‍या पुलाच्‍या कामाचे लोकार्पण समारंभास मंत्री विखे पाटील यांच्‍यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तालुक्‍यातील हिवरगाव पावसा येथे ग्रामस्‍थांची अडचण दुर व्‍हावी म्‍हणून पुलाच्‍या कामास निधी उपलब्‍ध करुन देण्‍याची ग्‍वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली होती. सुमारे २ कोटी ५० लाख रुपये या कामासाठी उपलब्‍ध करुन देत या कामाची पुर्तताही झाल्‍याने वचनपुर्ती समारंभ आयोजित करण्‍यात आला आहे.
संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरात सुमारे ४० लाख रुपयांच्‍या निधीतून विकसीत होत असलेल्‍या दशक्रिया विधी घाटाचे भूमीपुजन आणि तालुक्‍यातील १५० महिला बचत गटांना फुडप्रोसिसींग युनिटचे वाटप आणि ४०० बांधकाम कामांना गृहउपयोग साहीत्‍याचे वितरण आणि नारीशक्‍ती सन्‍मान सोहळ्याचे आयोजन शहरातील मालपाणी लॉन्‍स येथे दुपारी ३ वा. करण्‍यात आले आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *