आश्वी । झुंजार न्यूज
नाशिक येथील कलावंत विचारमंच व अमृत उद्योग समूहाच्या वतीने राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील सिनेअभिनेता प्रमोद पंडित यांना कलावंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, लोककवी वामनदादा कर्डक, कवी वसंत बापट व कवियित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती व स्मृती दिनाचे औचित्य साधून नाशिक येथील देवघेव सार्वजनिक वाचनालयात पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल आडगाव चित्रपटाचे दिग्दर्शक प्रा. डॉ. अनिलकुमार साळवे यांच्या हस्ते सिने अभिनेता, दिग्दर्शक प्रमोद पंडित यांना कलावंत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

स्वागताध्यक्ष सुनील मोंढे, डॉ. दीपाली सोसे, प्रा. सोमनाथ मुठाळ, सतीश खरात हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच सूत्रसंचालन बाळासाहेब गिरी व चंद्रिका वैजयंती यांनी केले.

प्रमोद पंडित यांनी मराठी चित्रपट, शॉर्ट फिल्म, वेब सिरीज, विविध गाणी यामध्ये दर्जेदार अभिनय कलावंत वितरण सादर करून चित्रपट सृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे.

त्यांचा सन्मान झाल्याबद्दल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह संरपच , उपसंरपच व पाथरे बुद्रुक ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

