आश्वी l झुंजार न्यूज
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे दोन दिग्गज नेते एकमेकांना आव्हान देत विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीत थेट संगमनेरातून थोरातांच्या विरोधात उमेदवारी करण्याची जोरदार तयारी सुरू केली. तर थोरातांनी शिर्डीतून महाविकास आघाडीकडून प्रभावती घोगरे यांना विखेंच्या विरोधात मैदानात उतरविण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांच्या पुत्रांनी एकमेकांना दडपशाही आणि दहशत हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून टीकेचे लक्ष्य केले आहे.
नगर लोकसभा मतदारसंघात झालेला पराभव डॉ. विखे पाटील यांच्या जिव्हारी लागला. थोरातांनी तिकडे कुमक धाडल्याने या पराभवास हातभार लागला. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी आपण कुठल्याही परिस्थितीत संगमनेरातून लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. थोरातांच्या विरोधात महायुतीकडे डॉ. विखे पाटलांएवढा सक्षम उमेदवार नाही. ते स्वतः मैदानात उतरल्या शिवाय निवडणुकीत रंगत येणार नाही. त्यामुळे ते मैदानात उतरणार आहेत. महाविकास आघाडीत राज्यपातळीवर थोरातांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. आघाडीला संधी मिळाली, तर मुख्यमंत्रिपदाचा सर्वसमावेशक आणि सर्वमान्य चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. स्वाभाविकपणे त्यांना सध्या राज्यभर फिरावे लागते. दिल्ली वाऱ्या कराव्या लागतात. आपल्या उमेदवारीमुळे त्यांना मतदारसंघात खिळवून ठेवता येईल,
डॉ. विखे शिवसेनेकडून लढणार ?
■ संगमनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळविण्यास काही तांत्रिक अडचण आल्यास माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या समोर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून उमेदवारी मिळविण्याचा पर्याय देखील खुला आहे. ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे असल्याने संगमनेरात राणे पॅटर्नचा अवलंब डॉ. विखे पाटील करू शकतात, अशी माहिती शिवसेनेच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने माहिती दिली.
असा डॉ. विखे पाटलांचा कयास आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील तळेगाव, साकूर आणि हिवरगाव पावसा येथे प्रचारसभा घेऊन वातावरणनिर्मिती केली. थोरातांच्या दडपशाही आणि दहशतीच्या विरोधात आपण ही लढाई करीत असल्याचे जाहीर केले. तर महाविकास आघाडीच्या राहाता येथे झालेल्या मेळाव्यात थोरातांनी, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात दहशतवाद से मुक्ती हे घोषवाक्य समोर ठेवून शिडों विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदयात्रा काढतील, अशी घोषणा केली.
यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात उमेदवारी करणाऱ्या प्रभावती घोगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून काँग्रेस पक्षात प्रवेश करुण घेत त्यांच्यामागे आपण शक्ती उभी करणार असल्याचे संकेत दिले
शिर्डी व संगमनेर मध्ये डॉ सुजय विखे पाटील यांनी “संघर्ष यात्रा ” तर डॉ जयश्री ताई थोरात ” युवा संवाद ” यांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करत जोरदार आपल्या भाषण्यातून टिका करताना दिसत
Post Views: 885
