संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

सुसंस्कृत तालुका अशी ओळख असल्या संगमनेर मध्ये निवडणुकीच्या निमित्ताने येऊन तरुणांची माथी भडकावण्याबरोबर तमाम महिला भगिनींचा अपमान करणाऱ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा महिलांनी चांगला समाचार घेतला असून विखेंची सभा उधळली आहे .

 

 

 

धांदरफळ खुर्द येथे बाजारतळ येथे स माजी खासदार सुजय विखे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केले होते. मात्र या सभेमध्ये अध्यक्षस्थानी असलेले वसंतराव देशमुख हे होते.

 

 

यावेळी वसंतराव देशमुख यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या बद्दल अत्यंत आक्षेपहार्य वक्तव्य केले याचबरोबर त्यांनी तमाम महिला भगिनींचा अत्यंत अवमानकारक उल्लेख करून समस्त महिला भगिनींचा अपमान केला आहे. यामुळे सभेमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. हे ऐकताच धांदरफळ गावांमधील अनेक महिला एकत्र आल्या आणि त्यांनी सभास्थळी धाव घेतली.

 

 

यावेळी सुजय विखे यांचे भाषण सुरू होते. सुजय विखे ही सूड भावनेने आणि अत्यंत गलिच्छ पद्धतीने वक्तव्य करत होते. संगमनेर तालुक्याची संस्कृती ही अत्यंत चांगली आहे मात्र मागील काही दिवसांपासून विखे यांनी सातत्याने विकृत वक्तव्य करून समाजामध्ये अशांतता पसरवण्याचे काम केले आहे. याचबरोबर महिलांचा सातत्याने अपमान केला आहे. हे भाषण सुरू असतानाच महिलांचा लोंडा सभास्थळेकडे येत होता. याप्रसंगी काही कार्यकर्त्यांनी महिलांना अडवले . याप्रसंगी विखे यांनी भाषण आटोपते घेतले.

 

 

तसेच वसंतराव देशमुख यांनाही नियोजन करताना भाषण संपवण्यास सांगितले. सर्वत्र गंभीर वातावरण झाले असताना सभा संपून तातडीने निघत असताना महिलांनी सुजय विखे वसंतराव देशमुख यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. हे वृत्त समजतात संगमनेर तालुक्यात व शहरात अनेक ठिकाणी या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध झाला

 

 

याचबरोबर विखे यांच्या समवेत लोणी कडे जाणाऱ्या अनेक गाड्या संगमनेर तालुक्यातील तरुणांनी अडवल्या यावेळी संगमनेर तालुक्यातील युवक व राहता तालुक्यातील व लोणी परिसरातील युवकांमध्ये बाचाबाची निर्माण होऊन तणावपूर्ण वातावरण झाले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed