{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

संगमनेर l झुंजार न्यूज

धादंरफळ येथे एका सभेत एका वयस्कर व्यक्तीने आपल्या वयाचा विचार न करता महिलाबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जावून निदंणीय वक्तव्य केले अशा सुसंस्कृत तालुक्यात तणाव निर्माण करणाऱ्याला पोलीस प्रशासनाने तातडीने अटक करावी अन्यथा आम्ही गढूळ वातावरण करणाऱ्या  धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले 
यावेळी देशमुख पुढे म्हणाले की , डॉ सुजय विखे यांच्या धांदरफळ खुर्द येथे झालेल्या सभेत वसंतराव देशमुख या गृहस्थानी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात यांच्या बद्दल अत्यंत आक्षेपहार्य वक्तव्य केले याचबरोबर त्यांनी महिला भगिनींचा अत्यंत अवमानकारक उल्लेख करून महिला भगिनींचा अपमान केला आहे. यामुळे सभेमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. संगमनेर तालुक्याची संस्कृती ही अत्यंत चांगली आहे मात्र मागील काही दिवसांपासून विखे यांनी सातत्याने विकृत वक्तव्य करून समाजामध्ये अशांतता पसरवण्याचे काम केले आहे. याचबरोबर अशिल व गलिच्छ व्यक्तव्य करुन तणावपुर्ण वातावरण निर्माण करण्याचा आतापर्यंत झालेल्या सभेतून दिसून आले आहे .
सुसंस्कृत तालुक्यात गढूळ वातावरण निर्माण करुन दहशत व दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून आता दहशत व दडपशाही कोण करतो हे लोकांच्या लक्ष्यात येवू लागले आहे 
रणजितसिंह देशमुख ( चेअरमन , राजहंस दूध संघ )
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *