संगमनेर l झुंजार न्यूज
रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव राजाभाऊ कापसे यांनी पक्षाच्या सदस्य अथवा पदाचा कुठल्याही प्रकारे राजीनामा न देता त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये प्रवेश केल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांना पक्षातून निलंबीत करण्यात आले असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्रारे दिली .

प्रसिध्दी पत्रकात भालेराव पुढे म्हणाले की , 2024 च्या विधानसभा निवडणुकीमधून रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीकडे १२ जागेच्या मागण्या केल्या होत्या मात्र तिन्ही पक्षाच्या जागा वाटपाच्या गोंधळात रिपाईला जागा मिळाल्या नसल्याने कार्यकर्त्यामध्ये नाराजी निर्माण झाली असली तरी सर्व कार्यकर्त्यानी युतीचा धर्म म्हणून इतरत्र न जाता पक्षातचं राहून शांत रहाण्याची भूमिका घेतली मात्र अहिल्यानगर जिल्हयातील श्रीरामपूरची जागा रिपाईसाठी मागितली होती येथून राजाभाऊ कापसे , सुरेंद्र थोरात हे निवडणुक लढविण्यास इच्छुक होते मात्र जागेच्या वाटाघाटीत श्रीरामपूरची जागा न मिळण्याचे चिन्ह दिसू लागल्याने रिपब्लिकन असणारे राजाभाऊ कापसे हे श्रीरामपूरमधून निवडणुक लढविण्यास ठाम असल्याने रिपब्लिकन पक्षाचे सदस्यत्व व असणाऱ्या पदाचा राजीनामा न देता त्यांनी मनसे मध्ये प्रवेश केल्याने कापसे यांचा आणि रिपब्लिकन पक्षाचा आता कुठलाही संबंध राहिला नसल्याचे श्रीकांत भालेराव यांनी जाहिर केले

तर पक्षाच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजाभाऊ कापसे यांच्याशी कुठल्याही प्रकारे संबंध ठेवू नये व संपर्कात राहून नये व महायुतीचे काम करावे असे आवाहन राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव , प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , राज्य सचिव दिपकराव गायकवाड , जिल्हा संपर्क प्रमुख भिमा बागुल , पप्पू बनसोडे यांनी केले आहे .

