संगमनेर l झुंजार न्यूज



यापूर्वी दूध संघाने 37 कोटी रुपये बँकेत वर्ग केले आहे. अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे सुमारे 100 कोटी रुपये बँकेत वर्ग झाल्याने बाजारपेठ फुलली आहे. बाजारपेठेमध्ये मोठी आर्थिक ऊलाढाल होत आहे . यावर्षी संगमनेर तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. याचबरोबर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून दुष्काळी भागाला निळवंडे कालव्यातून पाणी मिळाल्याने शेतकरी ,सर्वसामान्य नागरिक आनंदी आहे. अमृत उद्योग समूहातील विविध संस्था व कारखान्याने वर्ग केलेल्या 19 कोटी रुपयांमुळे मोठी आर्थिक उलाढाल होत असून संगमनेरची बाजारपेठ व व्यापाऱ्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.

कारखान्याने घेतलेल्या या निर्णयामुळे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, व्हा चेअरमन संतोष हासे ,सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचे सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे..

