रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) यांची कर्जत तालुका महत्वपूर्ण बैठक संपन्न !
कर्जत l झुंजार न्यूज
जामखेड-कर्जत विधानसभा महायुतीचे उमेदवार भूमिपुत्र प्रा राम शिंदे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन नेते ना. रामदास आठवले यांची जाहीर सभा १२ नोव्हेबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता कर्जत येथे होणार असल्याची माहिती रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी दिली
कर्जत येथे झालेल्या कार्यकर्ता बैठकीतून विजयराव वाकचौरे बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव उपस्थित होते.

यावेळी प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे , उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश भैलुमे , संजय भैलुमे , दत्ता कदम , विशाल काकडे , राजू जगताप , सतीष अल्हाट , कुंडलिक गंगावणे, अक्षय भैलुमे, किरण अर्जुन भैलुमे, भिमराव वाघ, अविनाश चव्हाण, ईश्वर चव्हाण, अमोल देवळे, हौसराव मोरे, कैलास कांबळे, मल्हारी कांबळे, श्रीधर लोंढे, धीरज पवार, अमजद शेख, प्रशांत होले, सतीष वाघमारे, पोपट वाघमारे, विनोद वाघमारे, बापु डुकरे, वसीम शेख, सागर भैलुमे, सिध्दार्थ कदम, बाळासाहेब वाघमारे, हनुमंत वाघमारे, भिमराम कांबळे, अक्षय चव्हाण, बापु कांबळे, अजय साठे, धनराज शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

