{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

आश्वी l झुंजार न्यूज

शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या महायुती तथा भाजपाचे उमेदवार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ रिपब्लिकन नेते तथा केंद्रीय मंत्री ना . रामदास आठवले यांच्या उपस्थितीत सोमवार दि १८ नोव्हेबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता लोणी येथे सांगता सभा होणार असल्याची माहिती रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिली .
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमीत रॅली , गावो गावी व घराघरात मतदारांच्य गाठी – भेटी , प्रचार सभा धडाक्या होताना दिसत आहे . अमित शहा , नितीन गडकरी , रामदास आठवले यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठांसह महायुतीच्या उमेदवारांकरिता अनेक ठिकाणी प्रचार सभा घेवून मतदारांपुढे विकासकामाचा अजेंडा मांडताना दिसत आहे तर एकाचं हप्त्यात रामदास आठवले दुसऱ्यांदा जिल्ह्यात येत असून लोणी येथे सोमवार दि . १८ नोव्हेबर २०२४ रोजी दुपारी महायुतीचे उमेदवार ना . राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकरित केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले सभा घेवून आदीवाशी , मागसवर्गिय , शेतकरी , यांच्यासह तरुणांना मतदान करण्याचे आवाहन करत विकासात्मक कामाचा लेखाजोखा मांडणार असल्याचे सुरेंद्र थोरात यांनी सांगितले . 

तरी सांगता सभेला रिपाईसह युतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , विजयराव वाकचौरे , श्रीकांत भालेराव , भिमा बागुल , पप्पू बनसोडे , आशिष शेळके यांनी केले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *