आश्वी l झुंजार न्यूज
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकरिता उभे असणाऱ्या उमेदवाराचे आज भवितव्याकरिता अत्यंत उत्साहात मतदानाला सुरुवात झाली

अंभोरे येथून कॉग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात यांचे जावई तथा संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी पत्नी सौ शरयू देशमुख यांच्यासह मतदानाचा आपला पहिला हक्क बजावला .

रणजितसिंह देशमुख यांनी जनतेला विधानसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असून, मतदारांनी उत्साह दाखवत मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन देशमुखांनी केले आहे. विशेषतः तरुण आणि महिला मतदारांनी या लोकशाही उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

