मुंबई l झुंजार न्यूज
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने घसघशीत यश प्राप्त केली. त्यानंतर आता 2 डिसेंबरला मुख्यमंत्रिपदासाठी शपविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. त्यापूर्वी आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याबाबत चर्चा रंगली आहे. मंत्रिमंडळात भाजपला सर्वाधिक २० ते २५ मंत्रिपदं, तर शिंदेंच्या शिवसेनेला १०-१२ तर, अजित पवार गटाला ७-९ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.

सध्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळाली आहे, त्याची संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी – देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) , राधाकृष्ण विखे पाटील , गिरीश महाजन , रविंद्र चव्हाण , मंगलप्रभात लोढा , चंद्रशेखर बावनकुळे ,आशिष शेलार , शिवेंद्रसिंहराजे भोसले , राहुल कुल , माधुरी मिसाळ , संजय कुटे , गणेश नाईक , पंकजा मुंडे, नितेश राणे , गोपीचंद पडळकर

शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी – उदय सामंत
, शंभूराज देसाई , गुलाबराव पाटील , संजय शिरसाट , भरत गोगावले , प्रकाश सुर्वे , प्रताप सरनाईक , तानाजी सावंत , राजेश क्षीरसागर , आशिष जैस्वाल , निलेश राणे
राष्ट्रवादी संभाव्य मंत्र्यांची यादी – अजित पवार , धनंजय मुंडे , छगन भुजबळ , अदिती तटकरे , अनिल पाटील , हसन मुश्रीफ , धर्मराव बाबा अत्राम , आशुतोष काळे

