धानोरे l झुंजार न्यूज
संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड – किल्ल्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजायचा असेल तर त्यांच्या हातात आज मोबाईलऐवजी त्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यासाठी दगड – माती, चिखल, काळी – तांबडी माती त्यांच्या हाताला लागली पाहिजे. जवळपासचे गड – किल्ले यांना भेटी देवून त्यांची माहिती घेतली पाहिजे. त्यांना संरक्षित – संवर्धित केले पाहिजे. तरच महाराष्ट्राचे हे वैभव टिकून राहील. हे सारे कृतीतूनच शक्य होईल.तसेच या दिवाळीत नव्या कपड्यांसह पर्यावरणपूरक फटाक्यांची आतिषबाजी करत चटकदार – मसालेदार – खमंग फराळाबरोबर गोड – गोड लाडूची मजा घेत… असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड – किल्ल्यांची प्रतिकृती बनवायची कल्पना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघेवस्ती(धानोरे)शाळेचे कर्तव्यदक्ष,आदर्श मुख्याध्यापक प्रभाकर शिंदे सर यांच्या कल्पक बुद्धीला आली.
त्यांनी इयत्ता पहिली ते चौथी तील विद्यार्थ्यांना इयत्ता निहाय दिवाळीच्या सुट्टीत किल्ले बनविण्याची स्पर्धा घेण्याचे ठरविले.चार गटात स्पर्धा होती.इयत्तानिहाय प्रथम तीन क्रमांक परिक्षणाअंती जाहीर करण्यात आले.प्रथम क्रमांक – स्मृती अंत्रे,शिवांश सजगुरे,कार्तिक शिंदे,समर्थ शिंदे, द्वितीय क्रमांक — ओम डुक्रे,चैतन्य डुक्रे, रुद्र दिघे,स्वरा भूमकर,तृतीय क्रमांक — काव्या शिंदे,सार्थक खेमनर,सोहम ढमक या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात मुख्याध्यापक श्री.प्रभाकर शिंदे सर यांच्या वतीने बक्षीसे देण्यात आली.
परिक्षक म्हणून श्री.प्रभाकर शिंदे सर,श्री.राजेंद्र बोकंद सर व श्री.सोमनाथ अनाप सर यांनी काम पाहिले.सदर उपक्रम यशस्वितेसाठी श्रीम.विद्याताई उदावंत मॅडम, श्रीम.सुनिता ताजणे मॅडम, श्रीम.मनिषा शिंदे मॅडम व श्रीम.सरगम मोटे मॅडम यांचे सहकार्य लाभले.

