{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थीना बक्षिस वाटप

 

 

 

आश्वी l झुंजार न्यूज

 

 

 

 

संगमनेर तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा,निळवंडे ची जिल्हास्तर कम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन उत्सव स्पर्धा २०२४ – २५ मध्ये सलग दुसऱ्या वर्षी उत्तुंग यश मिळाल्या बद्दल आमदार अमोल खताळ यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्हातुन १० हजार ५६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली होती. त्यात जिल्ह्यातून १० शाळां मधील ३० उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड झाली यामध्ये जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळाला

 

 

 

 

रेडियन्स हॉटेल, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये निळवंडे शाळेने ‘ध्वनी प्रदूषण थांबवा, शिक्षण वाचवा!’ या विषयावर प्रोजेक्ट सादर करून तृतीय क्रमांक पटकावला.इयत्ता पाचवीच्या वर्गातील श्रीराज गणेश पवार, कीर्ती संदीप पवार आणि धनश्री दादासाहेब पवार या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे प्रोजेक्टचे सादरीकरण केले. यामध्ये विध्यार्थीनी ४३ इंची टीव्ही, तीन लेनिओ कंपनीचे टॅब, ॲलेक्सा आणि प्रमाणपत्र अशी सुमारे ७० हजार किमतीची भरघोस बक्षीसे विद्यार्थ्यांनी शाळेसाठी जिंकली. यावेळी मुख्याध्यपक रमेश निघुते कैलास दिघे तुषार फल्ले अण्णासाहेब मरभळ आदी शिक्षकाचे मार्गदर्शन लाभले.

 

 

 

 

यावेळी सरपंच शशिकला पवार, उपसरपंच भआऊसाहेब आहेर,तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी आहेर, उपाध्यक्ष राजेद्र वारे, दत्तात्रय आहेर, ग्रामसेवक निकम, सचिन केरे, अभिषेक उकिर्डे, अर्थव जोशी, हर्षद भुसारी, अरविंद भुसारी, ग्रामपंचायत सदस्या सुनिता भुसारी, ताराबाई केरे, सुनिता गायकवाड, रूपाली पवार यासह ग्रामस्त पालक उपस्थित होते.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *