संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर विभाग सहकारी दूध उत्पादक सोसायटीच्या व्हाईट चेअरमनपदी संस्थेचे संचालक मच्छिंद्र शंकर गुंजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे
संगमनेर विभाग सहकारी उत्पादक सोसायटीचे व्हा चेअरमन पोपट महाराज आगलावे यांनी स्वतःहून मनाचा मोठेपणा दाखवत पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर व्हा चेअरमन पदासाठी संस्थेच्या कार्यालयात अहिल्यानगरचे जिल्हा उप निबंधक कार्यालयातील सहकार अधि कारी सुधीर गाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यांना सहाय्यक म्हणून संस्थेचे मॅनेजर जालिंदर पानसरे यांनी सहकार्य केले

संस्थेचे संचालक मच्छिंद्र शंकर गुंजाळ यांची व्हाचेअरमनपदी निवड करावीअशी सूचना ज्येष्ठ संचालक संभाजी गुंजाळ यांनी मांडली त्यास संचालक मंगेश राम भाऊ कांडेकर यांनी अनुमोदन दिले त्या नंतर संस्थेचे जेष्ठ संचालक मच्छिंद्र शंकर गुंजाळ यांची व्हाचेअरमनपदी बिनविरोध निवड झाली असल्याची घोषणा निवडणूक निर्णयाधिकारी सुधीर गाडे यांनी केली

यावेळी संस्थेचे चेअरमन कैलास घोडेकर मावळते व्हा चेअरमन पोपट महाराज आगलावे गुंजाळवाडी माजी सरपंच तुकाराम यांच्यासह संचालक संचालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नूतन व्हा गुंजाळ यांचा यावेळी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला
