आश्वी । झुंजार न्यूज
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय आश्वी खु. यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष शिबीराचे गुरुवार, दिनांक ०२ जानेवारी २०२५ ते बुधवार, दिनांक ०८ जानेवारी २०२५ या कालावधीत मौजे पिंप्री लौकी अजमपूर येथे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सदैव प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यामध्ये श्रमसंस्कार, स्वावलंबीवृत्ती, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक जाणीव व जागृती आदी गुणांची जोपासना व्हावी यासाठी मौजे पिंप्री लौकी अजमपूर येथे स्वच्छता, वृक्षरोपण, डिजिटल सर्वेक्षण, पथनाट्याच्या माध्यमातून आरोग्य, सामाजिक जनजागृती, व्याख्याने आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रम अधिकारी प्रा. अमित शिंदे यांनी दिली.

या शिबीर प्रसंगी आश्वी पंचक्रोशी व मौजे पिंप्री लौकी अजमपूर येथील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. महेश खर्डे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे यांनी केले आहे.
