आश्वी । झुंजार न्यूज

2025 या नवीन वर्षात पदार्पण करताना संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण इग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी संध्या भेडसावत असणाऱ्या मानवी जीवनावरील पर्यावरण हानी , मोबाईल सर्रास वापर , निकृष्ट दर्जाच्या वातावरणातील आरोग्यासह विविध समस्यावर सोशल मिडीया वापर टाळून , लिहा – वाचा – बोला हा संकल्प प्रतिज्ञाद्रारे केला .
संध्या सोशल मिडियाचा वापर अतिवापर, पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास,, थोरा-मोठ्यांबद्दल कौटूंबिक वातावरण हे यामुळे जी हानी होत चालली आहे त्याविषयी बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बदल करत मी- वाचणार, मी – बोलणार, मी- लिहीणार, सोशल मिडीया फेसबुक,इंन्स्टाग्राम यामुळे लोप चाललेली संस्कृती, लोप चालले नाते संबंध तसेच पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी वृक्षारोप, वृक्षसंवर्धन, प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणार हा संकल्प 2025 या नविन वर्षाला घेतला .
मानवी जिवनात सोशल मिडिया, समाजातील प्रत्येक घटक हा मोबाईल व सोशल मिडियाच्या विळख्यात गुंतलेला आहे. शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे .म्हणून आम्ही सोशल मिडीयापासून दूर रहाणार, वाचन संस्कती जपणार अशी शपथ घेत पर्यावरणा वाढीकरिता वृक्षरोपन करणार बालपन वि दयार्थ्यानी गेल्या दहा वर्षात 5000 वृक्षांची लागवड करत त्याचे संगोपण केले .
तर आई,वडिल,शिक्षक व थोरा मोठ्यांचा आदर ठेवून  नविन वर्षात समाजासमोर एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करणार हा संकल्प विदयार्थ्यांनी केला . 

यावेळी बालपणच्या प्रमुख सौ.सोनाली मुंढे यांच्यासह सर्व शिक्षकांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *