प्रवरानदी ही अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायी–सौ दुर्गाताई तांबे

प्रवरानदीमुळे तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिकांचे जीवन समृद्ध–डॉ मैथिलीताई तांबे

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

अलनिनोच्या भीतीमुळे यावर्षी नागरिकांमध्ये मोठी चिंता होती. मात्र ईश्वराच्या कृपेने जुलै महिन्यामध्ये भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण भरून प्रवरा नदी दुथडी वाहत आहे. या आनंदाचे संगमनेरकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले असून संगमनेर मधील महिलांनी प्रवरा नदीची खनानारळाने ओटी भरून तिची पूजा केली .याचबरोबर सर्व नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या या अमृतवाहिनी बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

गंगामाई घाट येथे माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, शहराध्यक्ष सौ प्रमिलाताई अभंग, नगरसेविका सौ.सीमाताई खटाटे, सौ. सरोजना पगडाल, सौ दिपाली पांचारिया, सौ नंदा गरुडकर, सौ ज्योती अभंग, सौ कलंत्री भावी, डॉ. अनुराधा सातपुते, नगरसेवक मुजीब खान लाला पठाण, भारत बोराडे, सौरभ कासार, बाळासाहेब कानवडे मुकुंद गरुडकर, संजय पगडाल ,अलोक बर्डे , अंबादास आडेप यांच्यासह विविध कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी सर्व महिलांनी प्रवारा नदीची पूजा करून खनानारळाने ओटी भरली याचबरोबर नदीने आपल्या जीवनात आनंद निर्माण केल्याबद्दल तिच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, प्रवरा अमृतवाहिनी ही रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिरापासून सुरू होते. या नदीवर भंडारदरा आणि निळवंडे धरण आहे. प्रवरा नदीचे महत्व संगमनेरकर आणि उत्तर नगर जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवनात मोठे आहे. या नदीमुळे शेती फुलली आहे .जीवनमान फुलले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या नदीवर निळवंडे धरण निर्माण केले असून या धरणामुळे दुष्काळी भागात पाणी आले आहे. ही नदी जीवनदायी असून या पुढील काळातही कायम वाहत राहो. सर्वांच्या जीवनात समृद्धी निर्माण होवो अशी प्रार्थना त्यांनी केली.


तर डॉ. मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, निळवंडे धरणामुळे संगमनेर शहरातील नागरिकांना थेट पाईपलाईन द्वारे दररोज स्वच्छ व मुबलक पाणी मिळत आहे. यावर्षी धरणे लवकर भरल्याने नागरिकांना चांगले पाणी मिळणार आहे. नदीला भारतीय संस्कृतीमध्ये आईची महत्त्व दिले आहे. आणि या अमृतवाहिनीने आपल्या सगळ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. प्रवरा नदीला दुथडी पूर आला असून नागरिकांनी या काळामध्ये सतर्क रहावे याचबरोबर तरुणांनी सेल्फी साठी स्टंटबाजी न करता अधिक काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी नदीचे पूजन करून तिच्या प्रतिक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमासाठी संगमनेर शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *